राधारंग फाउंडेशन च्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय नाट्यगीत गायन स्पर्धेत सर्वेश राऊळ प्रथम.

वेंगुर्ला.
राधारंग फाउंडेशन पुरस्कृत आणि परुळे युवक कला क्रिडा मंडळ आयोजित जिल्हास्तरीय नाट्यगीत गायन स्पर्धा परुळे येथे संपन्न झाली.परुळे येथील वराठी मंगल कार्यालयात पार पडलेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील १८ स्पर्धक सहभागी झाले होते.सर्वच स्पर्धकांनी सुरेल गाणी सादर करुन रसिकांना मंत्रमुग्ध केले.यामधे सर्वेश राऊळ याने प्रथम क्रमांक, वैष्णवी चव्हाण व्दितीय, केतकी सावंत तृतीय आणि संपदा तांडेल हिने उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवले. विजेत्यांना अनुक्रमे रु,३०००/-.,२५००/-,२०००/- आणि १०००/- तसेच राधाबाई चषक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेचे परिक्षण संगीत क्षेत्रातील नामवंत श्री.भालचंद्र केळुसकर आणि श्री.दिलीप ठाकूर यांनी केले. परिक्षकांनी याप्रसंगी बोलताना नाट्यसंगीत गाताना रागांचे भान राखण्याचे महत्व आणि स्वतःच्या आवाजात गाण्याचे कसब याबाबत स्पर्धकांना मार्गदर्शन केले. या स्पर्धेसाठी बाळकृष्ण नाईक आणि गौरव पिंगुळकर यांनी संगीतसाथ दिली. स्पर्धेचे परिक्षक,राधारंगचे पदाधिकारी आदि मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले.याप्रसंगी राधारंग फाउंडेशन आणि परुळे युवक कला क्रिडा मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.