आगामी निवडणुकीत उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शुन्य खासदार. नारायण राणेंचा देवरुखातील मेळाव्यात उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल.
देवरुख.
मोदींवर टीका केली म्हणजे मोठ होता येत नाही. अरे तुमच्या पक्षाचे खासदार किती आहेत, फक्त पाच! ते येणाऱ्या निवडणुकीत झिरो होणार आहेत हे लक्षात ठेवा अशी ठाकरेंवर टीका करत कोकण समृध्द करण्याबरोबरच रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे जिल्हे देशात आर्थिक सबळ व्हावेत ही आपली मनापासूनची इच्छा असून त्यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देवरुखात केले.पुढे ते म्हणाले "उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मंत्रालयात किती वेळा गेले आणि या खासदारांनी गेल्या दहा वर्षात काय दिवे लावले असाही प्रश्न राणेंनी उपस्थित केला.महायुतीचा संंगमेश्वर तालुक्याचा मेळावा देवरुख येथील माटे-भोजने सभागृहात सोमवारी संध्याकाळी पार पडला. या मेळाव्यात बोलताना केंद्रिय मंत्री नारायण राणे पुढे म्हणाले कि, जगामध्ये तरूण देश म्हणून आपला भारत देश ओळखला जातो.आपल्या भारत देशाला विकसीत करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. गेल्या १० वर्षात मोदीजींनी जगात विकसीत देश म्हणून आपल्या भारत देशाला नावलौकिक मिळवून दिला आहे.जगातील विकसीत देशामध्ये आपल्या भारताला मोदींनी पाचव्या क्रमांकावर आणले आहे. कोरोनाकाळात मोदींनी ८० कोटी लोकांना मोफत धान्य दिले. ८ कोटी लोकांना नळाने पाणी दिले.पावणे चार कोटी गरीबांना पक्के घर बांधून दिले.नेत्याला डोळसपणा लागतो. तो मोदींकडे आहे. म्हणूनच आपला भारत देश प्रगती करत आहे. असे ना.राणे म्हणाले. आणि या प्रगतीत भर घालण्यासाठी आपण मला किमान ३ लाख मताधिक्यांनी निवडुन द्याल असाही आशावाद व्यक्त केला.महायुतीच्या या मेळाव्याला व्यासपीठावर सदानंद भागवत, राजेश पत्याने, माजी आमदार सदानंद चव्हाण, आरडीसीसी बँकेचे संचालक राजेंद्र सुर्वे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पोमेंडकर, शिवसेना शिंदेगटाचे तालुका प्रमुख प्रमोद पवार, राष्ट्रवादिचे बाळू ढवळे, भाजपचे विधानसभा क्षेत्र प्रमुख प्रमोद अधटराव, जिल्हा उपाध्यक्ष मुकुंद जोशी,तालुकाध्यक्ष रुपेश कदम,माजी नगरसेवक प्रफुल्ल भुवड,हनीफ हरचीरकर,आरपीआयचे राजेंद्र मोहिते, भाजपच्या नेत्या रश्मी कदम,भाजपच्या जिल्ह्याच्या कोमल रहाटे, माजी नगराध्यक्ष मृणाल शेट्ये, शिंदे, संसारे, तालुका महिला तालुका संघटक नेत्रा शिंदे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अनुराग कोचीरकर, सागर संसारे आदी व्यासपिठावर उपस्थित होते.
यावेळी आमदार शेखर निकम म्हणाले "सदानंद चव्हाण आणि मी त्यावेळी विरोधी लढलो असलो तरी एका चांगल्या कामासाठी एकत्र आलो आहोत. आम्हांला निवडून द्या आम्ही सेवक म्हणून आपले सदैव काम करू अशी ग्वाही देण्याबरोबरच प्रत्येकाने एकजनसी व्हा, एक जीव होऊन काम करुया आणि मताधिक्य देऊया. पर्यटनाच्या माध्यमातून आपल्याला विकास अजूनही करता येईल असे म्हणत पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी तालुक्या एवढा तरी निधी आम्हाला द्यावा असे आमदार शेखर निकम यांनी सूचित केले.
पालकमंत्री उदय सांमत म्हणाले महायुती हे आता कुटुंब म्हणून काम करत असताना एका मेळाव्याची गरज होती. म्हणून या मेळाव्याच्या आयोजन करण्यात आले. होणाऱ्या मतदानाच्या ७० टक्के मतदान नारायण राणे यांना होईल. ज्याप्रमाणे आमदार शेखर निकम यांनी पायाला भिंगरी लावली आहे. त्यानुसार ते नक्कीच आमच्यापेक्षा जादाचे मताधिक्य देतील यात संदेह नाही. पण तुम्ही मताधिक्य दिलेत म्हणून मी काही नाराज होणार नाही. उलट तुम्हाला डीपीडीसी मधील जास्त निधी माझ्याकडून असेल असेही शेखर निकम यांच्या वाक्यावर त्यांनी स्पष्ट केले. पुढे सामंत म्हणाले मी वर्षभर बघतोय आम्ही गुवाहाटीला गेलो, तेव्हापासुन आम्हाला टोमणे मारणे सुरू आहे. कालच्या रत्नागिरीतील सभेला गर्दी कमी असल्याचेही सामंतांनी यावेळी म्हटले तसेच त्यावेळी राणें सोबत त्यावेळी असणा-या कार्यकर्त्यांनी आत्मचिंतन व आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचेही यावेळी सामंत म्हणाले. प्रमोद अधटराव यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.