चित्रांच्या माध्यमातून नशा मुक्तीचा संदेश......निवती पोलिसांनी केले कौतुक
वेंगुर्ला
नशा मुक्तीचा संदेश देणारी चित्रे रेखाटणाऱ्या पाट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना निवती पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांकडून गौरविण्यात आले. विशेष म्हणजे त्यातील ५० विद्यार्थ्यांची निवडण्यात आलेली चित्रे भिंतीवर लावून नशामुक्ती वॉल हा उपक्रम राबविण्यात आला आहे. अंमली पदार्थ मोहीम राबविताना पाट हायस्कूलमध्ये चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते कलाशिक्षक संदीप साळसकर यांच्या सहकार्याने ५०*३० फूट एवढ्या मोठ्या भिंतीवर एका वृक्षाची रचना करून त्याला चित्र लटकवलेली आहेत.
- या स्पर्धेतील विजेते स्पर्धक पुढील प्रमाणे
इयत्ता पाचवी ते सातवी प्रथम क्रमांक अर्जुन कुंभार, द्वितीय क्रमांक यश राऊत, तृतीय क्रमांक धनिषा परब, उत्तेजनार्थ भार्गवी केसरकर आणि पाचवा क्रमांक युगा कानडे. माध्यमिक गटामध्ये प्रथम क्रमांक अंकुर मेथर, द्वितीय क्रमांक दिशा सामंत, तृतीय क्रमांक अथर्व शेगले, चौथा क्रमांक अथर्व म्हापणकर, पाचवा क्रमांक धनदा सावंत, उच्च माध्यमिक गटात प्रथम क्रमांक ऋग्वेद कांबळी, द्वितीय क्रमांक जीवन गोसावी आणि तृतीय क्रमांक प्रतीक मेथर आदींनी पटकावला. यावेळी संस्था कार्याध्यक्ष विजय ठाकूर, मुख्याध्यापक राजन हंजनकर, पर्यवेक्षक सयाजी बोंदर, कलाशिक्षक संदीप साळसकर, तानाजी काळे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

konkansamwad 
