वेंगुर्ला बस स्थानकावरील साई मंदिराचा २७ वा वर्धापनदिन १० व ११ फेब्रुवारी रोजी.

वेंगुर्ला.
रा.प.वेंगुर्ला स्थानकावरील साई मंदिराचा २७ वा वर्धापन उत्सव शनिवार दि.१० फेब्रुवारी २०२४ ते रविवार दि.११ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत संपन्न होत आहे.
या निमित्ताने शनिवार,दि.१० फेब्रुवारी २०२४ सकाळी ८.०० वा. गणेश पूजन व धार्मिक विधी, सकाळी ९.०० वा. वेंगुर्ला शहरात श्री साईंची भव्य पालखी मिरवणूक, सायंकाळी ४.०० महिलांसाठी हळदीकुंकू, सायंकाळी ५.०० वा. ब्राह्मण प्रासादिक भजन मंडळ तेर्सेबांबर्डे, सायंकाळी ६.०० वा.भजन - खालचे बांबर भजन मंडळ, मातोंड, सायंकाळी. ७.००. वा. महाआरती व पालखी मिरवणूक, रात्री ९.०० वा. पार्सेकर दशावतार नाट्य मंडळ, वेंगुर्ला यांचा महान पौराणिक नाट्यप्रयोग- 'वेड्या बहिणीची वेडी माया' हा नाट्यप्रयोग होणार आहे.
रविवार, दि.११ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ८.०० वा.
महारुद्र जप सांगता, सकाळी १०.०० वा. श्री साईबाबांची महापूजा, सकाळी ११.०० वा. महाआरती व महानैवेद्य दुपारी १२.०० ते सायं. सायंकाळी ४.०० वा. महाप्रसाद, सायंकाळी. ४.०० वा. भजन - सिद्धेश्वर महिला भजन मंडळ खानोली, सायंकाळी ५.०० वा. गुणगौरव कार्यक्रम, सायंकाळी ७.०० वा. महाआरती, सायंकाळी ७.३० वा.साईंची पालखी, रात्री ९.०० वा चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळ, चेंदवण यांचा महान पौराणिक नाविन्यपूर्ण रहस्यमय ट्रिकनिनयुक्त दशावतारी नाट्यप्रयोग 'ब्रह्म पदार्थ' म्हणजे महिमा जगन्नाथ पुरीचा. हा नाट्यप्रयोग होणार आहे.तरी आपण आपल्या कुटुंबीय व मित्रपरिवारांसह या वर्धापन सोहळ्यास उपस्थित राहून साईबाबांचा सोहळा साजरा करण्यास सर्वतोपरी सहकार्य करावे असे आवाहन श्री साई मंदिर देवस्थान समिती व कर्मचारी वृंद रा.प.वेंगुर्ला आगार यांच्या वतीने करण्यात आले आहे.