सिंधुदुर्ग काँग्रेस पक्षाने घेतली जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहीकर यांची भेट

सिंधुदुर्गनगरी
सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांच्या नेतृत्वाखाली नूतन पोलीस अधीक्षक डाॅ. मोहन दहिकर यांची कार्यालयात भेट घेतली असून त्यांना पुष्पगुच्छ देऊन जिल्ह्यातील कामगिरीबाबत शुभेच्छा दिल्या. जिल्ह्यातील अनैतिक धंद्याना आळा घालावा, अंमली पदार्थांमुळे तरुणपिढी उद्ध्वस्त होत असून याचा बंदोबस्त करवा, घरफोड्यांचे प्रमाण वाढले असून यासंदर्भात उपाय योजना करावी. अश्या अनेक कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर पोलीस अधीक्षक यांच्याशी सविस्तर चर्चा काँग्रेस शिष्टमंडळाने केली. यावेळी प्रांतिक सदस्य प्रकाश जैतापकर, जिल्हा उपाध्यक्ष विजय प्रभू, सरचिटणीस अरविंद मोंडकर, प्रवीण वरूनकर, विनायक मेस्त्री, सावंतवाडी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, कुडाळ तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, माजी जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष देवानंद लुडबे, प्रवीण मोरे, वेंगुर्ला युवक काँग्रेस अध्यक्ष प्रथमेश परब, ओरोस शहर अध्यक्ष महेश परब, व्ही.के. सावंत, बाबू गवस, सावंतवाडी सेवादल अध्यक्ष संजय लाड, सुभाष नाईक इत्यादी उपस्थित होते.