परुळे येथे हाफ मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद.

परुळे येथे हाफ मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद.

वेंगुर्ला.

   राधारंग फाउंडेशन पुरस्कृत आणि परुळे युवक कला क्रीडा मंडळ आयोजित हाफ मॅरेथॉन २०२४ आज परुळे येथे उत्साहात पार पडली.पहाटे ६.०० वाजता सुरू झालेल्या या मॅरेथॉनमध्ये सिंधुदुर्गमधील छोटे,जेष्ठ नागरिक, डाॕक्टर्स,
व्यावसायिक यासह 360 रनर उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.ही मॅरॕथॉन पाच दहा आणि २१ किलोमीटर अशा तीन प्रकारांमध्ये पार पडली. ५ किमीसाठी २५६,१० किमीसाठी ८३ तर २१ किमीसाठी २३ जणांनी  सहभाग नोंदवला.
सहभागी झालेल्या प्रत्येकाला आयोजकांतर्फे मेडल्स टी-शर्ट आणि इतर आवश्यक वस्तू पुरवण्यात आल्या. मॅरेथॉन से मुख्य प्रायोजक इंडियन ऑइल चे झोनल मॅनेजर श्री तटकरे यांच्या हस्ते  फ्लॕग ऑफ करून मॅरेथॉनची सुरुवात करण्यात आली. सहभागी झालेल्यांसाठी बॕ.नाथ पै काॕलेज आॕफ फिजीओथेरपी या काॕलेजकडून फिजीओथेरपी सुविधा देण्यात आली. इंडियन ऑईल (सर्वो) ने या मॅरेथॉनचे प्रायोजकत्व स्वीकारले होते तर सारस्वत बँक,लोकमान्य मल्टीपर्पज सोसा.लि.,वेतोबा पेट्रोलियम (नायर एनर्जी),राणे हाॕस्पीटल अँड रिसर्च सेंटर हे सहप्रायोजक होते.इंडियन ऑईलचे श्री.तटकरे, निवती पो.स्टे.चे सहाय्यक पो.निरिक्षक श्री.सय्यद यांच्या हस्ते सर्व सहभागींना मेडल्स देण्यात आली. सुंदर व नीटनेटके नियोजन, सोयी व सुविधा,निसर्गरम्य मार्ग यामुळे सर्व सहभागींनी मॅरेथॉनचा आनंद घेतला. याप्रसंगी राधारंग फाउंडेशन व परुळे युवक कला क्रिडा मंडळाचे सर्व सदस्य आणि अन्य स्वयंसेवक या नियोजनात सहभागी होते.