भाजप च्या वतीने जिल्ह्यात २१ जानेवारी रोजी मंदिर स्वच्छता अभियान. केंद्रीय मंत्री नारायण राणे होणार सहभागी.

भाजप च्या वतीने जिल्ह्यात २१ जानेवारी रोजी मंदिर स्वच्छता अभियान.  केंद्रीय मंत्री नारायण राणे होणार सहभागी.

सिंधुदुर्ग.

   भारतीय जनता पार्टी च्या वतीने २१ जानेवारी रोजी
आयोजित करण्यात आलेल्या मंदिर स्वच्छता अभियान कार्यक्रमात केद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे हे सहभागी होणार आहेत. सकाळी १० वा. कुणकेश्वर मंदिर देवगड, दुपारी १ वाजता लक्ष्मी नारायण मंदिर (वालावल) तालुका कुडाळ तर साय. ४ वा. सातेरी मंदिर वेंगुर्ला अशा तीन ठिकाणी होणार आहे. त्यात केद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे हे सहभागी होणार आहेत.
   देशामध्ये भारतीय जनता पार्टी तर्फे मंदिर स्वच्छता अभियान कार्यक्रम राबविण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा मध्ये पण सर्व तालुक्यांमध्ये भाजपा पदाधिकारी जिल्हातील मंदिर स्वच्छता मोहीम राबवित आहेत.त्यात दि.२१ जानेवारी २०२४ रोजी केंद्रीय मंत्री नारायण राणे स्वतः मंदिर स्वच्छता अभियान मध्ये सहभागी होणार आहेत. भाजपाच्या सर्व पदाधिकारी, लोक प्रतिनिधी, कार्यकर्ते यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केले आहे.