वेंगुर्ला येथे ९ डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन.

वेंगुर्ला येथे ९ डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन.

वेंगुर्ला.

   तालुका विधी सेवा समिती, वेंगुर्ला व तालुका बार असोसीएशन, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ०९ डिसेंबर, २०२३ रोजी दिवाणी न्यायालय, वेंगुर्ला येथे सकाळी १०.३० वाजता ना. उच्च न्यायालय महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांनी दिलेल्या निर्देशांस अनुसरुन व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग ओरोस यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यांत आले आहे. लोकअदालत पक्षकारांच्या हितासाठी आयोजित करण्यात आलेली आहे. त्यातून त्यांना कमीत कमी वेळात, कमीत कमी खर्चात प्रभावी न्याय मिळू शकतो. ज्या पक्षकारांची प्रलंबित असलेली दिवाणी व फौजदारी प्रकरणे, कौटुंबिक वाद, पोटगी आदी प्रकरणे तसेच, वीज वितरण कंपनी, दुरसंचार निगम, वित्तीय संस्था, बँका, ग्रामपंचायती यांनी आपली जास्तीत जास्त प्रकरणे दाखल करून वादपूर्व प्रकरणे तडजोडीने मिटविण्यांत यावी. यासाठी पक्षकारांनी राष्ट्रीय लोकअदालती दिवशी उपस्थित राहून खटले मिटवावेत. त्याकरिता संबधितांनी दिवाणी न्यायालय, वेंगुर्ला येथे संपर्क साधावा. संपर्कासाठी दुरध्वनी क्रमांक ०२३६६- २६२७०७ असा आहे. तसेच, ज्या पक्षकारांना आपले प्रकरण चर्चेद्वारे मिटवायचे असेल अशा पक्षकारांनी वादपूर्व चर्चेसाठी या न्यायालयात सुट्टीचे दिवस वगळून सकाळी १०.३० वाजता हजर राहावे. सदरच्या चर्चासत्रा मध्ये प्रतिधारित वकील श्री. एस. जी. ठाकूर व श्रीमती पी. व्ही. नाईक, हे मार्गदर्शन करतील.
   ज्या पक्षकारांना न्यायालयात प्रलंबित असलेले दिवाणी व फौजदारी खटले किंवा राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका, ग्रामपंचायतीकडील वादपूर्व प्रकरणे तडजोडीने मिटवायची आहेत त्यांनी आपली प्रकरणे तालुका विधी सेवा समिती, वेंगुर्ला या कार्यालयाकडे लवकरात लवकर दाखल करावीत असे आवाहन वेंगुर्ला दिवाणी न्यायाधीश तथा अध्यक्षा, तालुका विधी सेवा समिती, वेंगुर्ला मा. श्रीम. के. के. पाटील, व मा. श्री. डी. वाय. रायरीकर, सह दिवाणी न्यायाधीश, वेंगुर्ला यांनी केले आहे.