जम्मू काश्मीर मधील एका सुवर्णकाराने मोदींसाठी तयार केले चक्क ३ किलो चे चांदीचे कमळ.

जम्मू काश्मीर मधील एका सुवर्णकाराने मोदींसाठी तयार केले चक्क ३ किलो चे चांदीचे कमळ.

जम्मू काश्मीर.

  जम्मू- काश्‍मीरमधील एका सुवर्णकाराने अस्सल चांदीचे कमळ तयार केले आहे.भाजपचे पक्षचिन्ह असलेले हे कमळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट देण्यात येणार आहे.रिंकू चौहान असे या सुवर्णकाराचे नाव असून तो मुठी या गावातील रहिवासी आहे.चांदीचे हे कमळ बनविण्यासाठी रिंकू यांना १५ ते २० दिवस लागले. चौहान हे मागील नऊ वर्षांपासून भाजपमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्याकडे जम्मू-काश्‍मीर भाजप युवा मोर्चाच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी देखील आहे.अयोध्येतील राममंदिराची निर्मिती, ३७० कलम रद्द करून जम्मू-काश्‍मीरमध्ये दगडफेक थांबवणे आणि जम्मू-काश्‍मीरमध्ये झालेली विकासकामे पंतप्रधान मोदी यांनी करून दाखवली आहेत त्यामुळे या सर्वांबद्दल कृतज्ञता म्हणून हे कमळ त्यांना देणार असल्याचे रिंकू यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी यांना लवकरात लवकर भेटून हे कमळ भेट देता यावे अशी इच्छा रिंकू आणि त्यांची पत्नी अंजली यांनी व्यक्त केली.सुमारे तीन किलो चांदीचे हे कमळ मी स्वतः बनवले आहे, मला खात्री होती की नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर विराजमान होणारच.त्यांनी दिलेली आश्‍वासने पाळली आहेत त्याबद्दल कृतज्ञता म्हणून हे कमळ त्यांना भेट देणार आहे असे रिंकू पुढे म्हणाले.