दिव्यांगांना दाखल्यांसाठीचे सहकार्य यापुढेही कायम - दीक्षांत देशपांडे
कणकवली
दिव्यांग बांधवांना विविध योजनांसाठी लागणारे दाखले तत्काळ मिळावेत यासाठी महसूल प्रशासन यापुढेही कायम प्रयत्नशील राहील अशी ग्वाही तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी आज दिली. कणकवली तहसील कार्यालयात दिव्यांग पेन्शन धारकांसाठी हयात दाखला तसेच उत्पन्न दाखला मिळवून देण्यासाठी विशेष शिबिर आज झाले. आज दिवसभरात सुमारे शंभर दिव्यांगांना दाखल्यांने वितरण करण्यात आले. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी दीक्षांत देशपांडे बोलत होते. यावेळी संजय गांधी शाखेतील हेमलता तोरस्कर, आरती ढोणे, एकता दिव्यांग विकास संस्थेचे अध्यक्ष सुनील सावंत, सचिन सादये, यल्लप्पा कट्टीमणी, श्री. वारंगे, बाळकृष्ण बावकर, मोहन परब यांच्यासह दिव्यांग बांधव उपस्थित होते. यावेळी दिव्यांग बांधवांनी तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले.
konkansamwad 
