आ. वैभव नाईक यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणणार : काँग्रेस पक्षाच्या बैठकीत एकमुखी ठराव
महाविकास आघाडीचे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार आ. वैभव नाईक यांच्या प्रचारार्थ मालवण तालुका काँग्रेस कार्यकारणीची बैठक बुधवार 23 ऑक्टोबर रोजी हेरिटेज हॉटेल मालवण येथे संपन्न झाली. यावेळी मालवण तालुका काँग्रेसने आ. वैभव नाईक यांना भक्कम पाठिंबा देऊन त्यांना भरघोस मतांनी निवडून आणून तिसऱ्या वेळी आमदार करण्याचा एकमुखी ठराव या बैठकीत केला आहे.यावेळी या बैठकीस आ. वैभव नाईक व्यक्तीशा उपस्थित होते.
यावेळी तालुका काँग्रेस बैठकीस प्रांतिक सदस्य साईनाथ चव्हाण यांनी मार्गदर्शन केले यावेळी बोलताना ते म्हणाले की आ. वैभव नाईक यांचे वडील कै.विजयराव नाईक उर्फ ‘विजयभाऊ’ यांची कारकिर्द उल्लेखनीय होती.सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अशा पदांवर त्यांनी काम करून पक्ष वाढीसाठी मेहनत घेतली होती. सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून काम करणाऱ्या सर्वसामान्यांच्या अडीअडचणींना धावून जाणारे विजयभाऊंच्या शिस्तीचे आणि शब्दाचे पक्के होते. विविध क्षेत्रात त्यांनी स्वतःचे कर्तृत्व सिद्ध केले होते.तीच झलक आ. वैभव नाईक यांच्यामध्ये पाहायला मिळत आहे. आ.वैभव नाईक यांच्यावर देखील काँग्रेसची विचारधारा आहे त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना काळात व तौक्ते वादळात केलेले काम उल्लेखनीय आहे येणाऱ्या विधानसभेत काँग्रेसचे कार्यकर्ते,पदाधिकारी जीवाचे रान करून आ.वैभव नाईक यांना तिसऱ्या वेळी विधानसभेत पाठवणार आहेत असे सांगितले.
यावेळी काँग्रेस जिल्हा कार्यकारणी सदस्य बाळू मेस्त्री,काँग्रेस तालुकाध्यक्ष जेम्स फर्नांडिस यांचा आमदार वैभव नाईक यांनी सत्कार केला.
याप्रसंगी मेघनाथ धुरी,काँग्रेस ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष बाळू अंधारी, शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर,नितीन वाळके,काॅंग्रेस महिला तालुकाध्यक्ष ममता तळगावकर,पल्लवी तारी,श्रीकृष्ण तळवडेकर, संदेश कोयंडे,मधुकर लुडबे,हेमंत माळकर,लक्ष्मीकांत परुळेकर,बाबा मेंडिस आदी काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते