शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन. तालुका शिवसेनाप्रमुख नितीन मांजरेकर यांची माहिती.

शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन.  तालुका शिवसेनाप्रमुख नितीन मांजरेकर यांची माहिती.

वेंगुर्ला.
 
   सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या वाढदिवसानिमित्त दि.२९ व ३० ऑक्टोबर रोजी वेंगुर्ला शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर हे खास उपस्थित रहाणार आहेत.अशी माहिती वेंगुर्ला तालुका शिवसेनाप्रमुख नितीन मांजरेकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
   वेंगुर्ला तालुका शिवसेना संपर्क कार्यालय, वेंगुर्ला सप्तसागर येथे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांची माहिती वेंगुर्ला तालुका शिवसेनाप्रमुख नितीन मांजरेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपस्थितांत शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर जिल्हा संघटक सुनील मोरजकर, तालुका संघटक बाळा दळवी, मितेश परब, युवा शहर प्रमुख संतोष परब, बाळू सावंत यांचा समावेश होता.
   दि.२९ रोजी सकाळी ९ वाजता रामेश्वर वाचनालय येथे शिवसेना युवक शहरप्रमुख संतोष परब यांचे आयोजनाखाली जिल्हास्तरीय बुद्धीबळ स्पर्धा होणार आहे.दि.३० ऑक्टोंबर रोजी सकाळी ८.30 वाजता उपजिल्हा रुग्णालय वेंगुर्ला येथे सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेचे समन्वयक सचिन वालावलकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर व तज्ञ डॉक्टरांच्या टिम मार्फत मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे तसेच आयोजन करण्यात आले आहे. आरोग्य तपासणी यात रक्त चाचणी रक्तदाब तपासणी, मधुमेह तपासणी, कान, नाक, घसा तपासणी, स्त्री रोग चिकीत्सा, नेत्र तपासणी करण्यात येऊन मोफत औषध पुरवठा केला जाणार आहे. या ठिकाणी आयुष्यमान भारत कार्ड, आयुष्मान भारत PMJAY कार्ड नोंदणीचे काम मोफत करुन देण्यात येतील. सकाळी ९ वाजता श्री देव रामेश्वर मंदिर येथे सुशोभिकरणाच्या विविध विकासकामांचे महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षणमंत्री मराठी भाषामंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते शुभारंभ वेंगुर्ला शहर, ग्रामीण भागातील मान्यवर पदाधिकारी व स्थानिक ग्रामस्थांच्या उपस्थितीत शुभारंभ.
सकाळी १० वाजता-शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन
वालावलकर यांच्या वाढदिवसास शालेय शिक्षण मंत्री
दिपक केसरकर यांची उपस्थिती. तसेच वेंगुर्ला तालुका
शिवसेनेत विविध पक्षप्रवेश स्वागत आणि वेंगुर्ला
तालुक्यासाठी २ अॅम्ब्यूलन्स लोकार्पण, व भाषणे असा
कार्यक्रम निश्चित करण्यात आला असून शिवसेनेतर्फे
आयोजीत विविध कार्यक्रमांचा लाभ वेंगुर्ला शहरासह
तालुक्यातील जनतेने घ्यावा. असे आवाहन वेंगुर्ला तालुका शिवसेना प्रमुख नितीन मांजरेकर व शहर प्रमुख उमेश येरम यांनी केले आहे.