अभिनेता वैभव मांगले यांनी किल्ले निवती येथे दिली भेट

वेंगुर्ला
चित्रपट मालिका अभिनेते वैभव मांगले यांनी परुळे किल्ले निवती येथील अंगणवाडीला भेट दिली व छोट्या दोस्ता समवेत काही काळ घालवला. स्टार प्रवाह वाहिन्यांवर सुरू असलेली मालिका "कोण होतीस तू काय झालीस तू", या मालिकेतील सर्व कलाकार कोकण दौर्यावर आले असून चित्रीकरण निमित्ताने किल्लेनिवती समुद्रकिनारी ही सर्व मंडळी आली होती त्यावेळी वैभव मांगले यानी अंगणवाडी येथे भेट दिली. यावेळी अंगणवाडी सेविका सौ. परब यांनी मांगले यांचे स्वागत केले.