वेंगुर्ला विधी सेवा समिती तर्फे ज्येष्ठ नागरिक दिन साजरा.

वेंगुर्ला विधी सेवा समिती तर्फे ज्येष्ठ नागरिक दिन साजरा.

वेंगुर्ला.

  तालुका विधी सेवा समिती, वेंगुर्ला तालुका वकिल संघटना, वेंगुर्ला व ज्येष्ठ नागरिक संघ, वेंगुर्ला यांचे संयुक्त विदयमाने दि.१ ऑक्टोंबर रोजी साई मंगल कार्यालय वेंगुर्ला येथे जनजागृतीपर आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
   या कार्यक्रमांत तालुका विधी सेवा समिती, वेंगुर्ला व तालुका वकिल संघटना वेंगुर्ला यांचे तर्फे ॲड. श्री. एन. जे. गोडकर हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थीत होते. सदर कार्यक्रमांत अॅड.श्री.गोडकर यांनी ज्येष्ठ नागरीकांचे अधिकार व कायदे याबाबत समोर उपस्थीत ज्येष्ठ नागरिकांना सविस्तर मार्गदर्शन केले.
   यावेळी व्यासपिठावर ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष श्री. काळे सर, श्री. पिंगुळकर सर, श्री. गोडकर, श्री. शेख सर इत्यादी उपस्थीत होते. तसेच तालुक्यांतील सुमारे ५५ ज्येष्ठ नागरीक उपस्थीत होते. सदरच्या कार्यक्रमांसाठी मा. श्रीम. के. के. पाटील, अध्यक्षा, तालुका विधी सेवा समिती, वेंगुर्ला तथा दिवाणी न्यायाधीश, वेंगुर्ला व मा. श्री. डी. वाय. रायरीकर, सह दिवाणी न्यायाधीश वेंगुर्ला यांचे मार्गदर्शन लाभले.