कणकवली येथील तरळेत ३ जून रोजी गृहउपयोगी वस्तू संच वाटप

कणकवली
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत जिल्ह्यातील नोंदीत जिवीत (सक्रिय) बांधकाम कामगारांना गृहउपयोगी वस्तू संच (भांडी वाटप) करण्यात येते आहे. मे. मफतलाल इंडस्ट्रिज लि. यांच्या मार्फत वैभववाडी तालुक्यामध्ये संचाचे वाटप करण्यात येणार होते. परंतु वैभववाडी रस्त्याचे काम सुरु असल्याने वस्तूसंच वाटपाचा कार्यक्रम दि. 3 जून 2025 रोजी तरळे ग्रामपंचायत येथे आयोजित करण्यात आला आहे. सर्व बांधकाम कामगारांनी यांची नोंद घेण्याचे आवाहन सरकारी कामगार अधिकारी यांनी केले आहे. हे गृहउपयोगी वस्तूसंच विनामुल्य देण्यात येणार आहेत. या कार्यालयामार्फत असे सूचीत करण्यात येते की कामगारांनी कोणत्याही व्यक्ती, एजंट किंवा संघटना यांच्याशी कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार करु नये, जर अशा प्रकारच्या आर्थिक व्यवहारातून फसवणूक झाल्यास त्यास सरकारी कामगार कार्यालय जबाबदार रहाणार नाही. तरी अशा फसवणूकीबाबत तक्रार असल्यास जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये संपर्क करुन रितसर तक्रार दाखल करण्यात यावी, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी सिंधुदुर्ग या कार्यालयामार्फत करण्यात येत आहे.