भंडाऱ्यात बोलेरो आणि ट्रेलरची धडक

भंडारा
भंडारा येथील राष्ट्रीय महामार्गावरील साई प्रसाद हॉटेलसमोर भीषण अपघात घडला. यामध्ये बोलेरो कार आणि ट्रेलरची समोरासमोर धडक झाली. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. या अपघातात मृतांमध्ये अशोक देहरवाल, शैलेंद्र बघेल, शैलेश गोकुळपुरे, मुकेश बिंजेवार यांचा समावेश आहे. दरम्यान, अपघातात जखमी झालेल्या अविनाश नकाटोडे यांच्यावर भंडारा सरकारी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. या दुर्दैवी अपघातामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गुन्हा दाखल केला आणि पुढील तपास सुरू केला.