पाट हायस्कूल येथे सामाजिक वनीकरण तर्फे नेचर कॅम्पचे आयोजन.

पाट हायस्कूल येथे सामाजिक वनीकरण तर्फे नेचर कॅम्पचे आयोजन.

कुडाळ.

   सामाजिक वनीकरण विभागातर्फे पाट हायस्कूलमध्ये वर्षभर विविध उपक्रम घेतले जातात वृक्ष लागवड वृक्षदिंडी  वनीकरण यामध्ये बरेच पाट हायस्कूलचे विद्यार्थीही सहभागी असतात यावर्षीचा नेचर कॅम्प चे पाट तलाव या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते यामध्ये ५० विद्यार्थ्यांचा सहभाग होता त्यांना दुर्बिणीद्वारे विविध पक्षी निरीक्षण करण्याची संधी मिळाली पक्षांचा जीवनक्रम जैवविविधता मानव आणि वन्य प्राणी संघर्ष दुर्मिळ वन्य जाती वन्यजीव संरक्षण विविध औषधी वनस्पती अशा विविध विषयांचे माहिती देण्यात आली शाळा आणि संस्था प्रशासन यांच्यातर्फे विविध उपक्रमाचे चांगले आयोजन पाट हायस्कूलमध्ये केले जाते आणि सर्वांचा चांगला सहभाग असतो अशी  माहिती वनाधिकारी सुनील सावंत यांनी दिली.

    यावेळी हरित सेना उपक्रम प्रमुख संदीप साळसकर, सिद्धी चव्हाण मॅडम उपस्थित होत्या. उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना पक्षांच्या विषयी अधिक माहिती पीडीएफ स्वरुपात देण्यात आली.