कोकण, मुंबई, मध्य महाराष्ट्र, विदर्भात पाऊस जोरदार बरसणार; यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी.
पुणे.
राज्यात आज कोकण, विदर्भात आणि मध्य महाराष्ट्रात काही जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.यामुळे यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. किनारपट्टी व पश्चिम घाटाच्या परिसरात पुढील ३ दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे.
राज्यात मॉन्सूनसर्व दूर पोहोचला आहे. दक्षिण गुजरातवर हवेच्या वरच्या स्तरात वाऱ्याची चक्रिय स्थिती निर्माण झाली असल्याने राज्याच्या व केरळच्या किनारपट्टीवर हवेची द्रोणीय रेषा निर्माण झाली आहे. बंगालच्या किनारपट्टीवर हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले असून किनारपट्टी आणि पश्चिम घाटाच्या परिसरात पुढील तीन दिवस पावसाचा जोर राहणार आहे. उत्तर महाराष्ट्र व विदर्भात पूर्वमोसमी पावसासारखा मेघगर्जना, ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सातारा, पुणे जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज तर विदर्भ भातील बहुतांश जिल्ह्यांना तर मुंबई शहर, मुंबई उपनगरे, ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदूरबार जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुर्व विदर्भातील बऱ्याच जिल्ह्यात उत्तर महाराष्ट्र व मध्य महाराष्ट्र कोकणातील बहुतांश जिल्ह्यात विजांचा कडकडाट मेघगर्जना व ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.
त्यामुळे तेथे यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड या जिल्ह्यातील घाट विभागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे तेथे ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. तर विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात व नंदुरबार, धुळे नाशिक या जिल्ह्यात वीजांचा कडकडाट ४० ते ५० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. मुंबई, पालघर, ठाणे येथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे तेथे येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. दिनांक २६ जून रोजी रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, तर दिनांक २७ व २८ जून रोजी रायगड, पुणे, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर व सिंधुदुर्ग या जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे तेथे ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. दिनांक २६ जून रोजी विदर्भात वीजांचा कडकडाट, वादळी वारे तसेच ४० किलोमीटर वेगाने वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे मुंबई, ठाणे, रायगड, पुणे व कोल्हापूर या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर २७ जून रोजी पालघर, ठाणे, मुंबई या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे तेथे यलो अलर्ट देण्यात आला आहे.