युनेस्कोच्या नामांकनासाठी राज्यातील ११ शिवकिल्ले. सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभागाची सह्यांची मोहीम.
देवगड.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ले सिंधुदुर्ग आणि किल्ले विजयदुर्ग यांसह महाराष्ट्रातील ११ गडकिल्ले आणि तामिळनाडूमधील ०१ किल्ला असे एकूण १२ किल्ले युनेस्कोने नामांकनासाठी निवडलेले आहेत आणि त्याचा आढावा घेण्यासाठी युनेस्कोची टीम येत्या २७ सप्टेंबर २०२४ ते ०७ ऑक्टोबर २०२४ दरम्यान येवून आढावा घेऊन जाणार आहे. त्यामुळे आपल्या या १२ किल्ल्यांचे जास्तीत जास्त संवर्धन रहावे, तेथे कोणीही वाईट कृत्य किंवा अस्वच्छता करू नये याच्या जनजागृतीसाठी रविवार दिनांक २२ सप्टेंबर २०२४ रोजी सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभाग मार्फत किल्ले विजयदुर्ग येथे चला होऊया जागतिक वारसा नामांकनाचे साक्षीदार या ब्रीदवाक्यातून नामांकनाच्या समर्थनार्थ सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभागाचे जिल्हाध्यक्ष सुनिल राऊळ यांच्या नेतृत्वाखाली, जिल्हा सचिव दिपक करंजे, यांनी सह्यांची मोहीम राबविली. किल्ले विजयदुर्ग येथे विजयदुर्ग गावचे प्रथम नागरिक सरपंच रियाझ काझी यांनी आपली स्वाक्षरी करून या स्वाक्षरी मोहिमेचा शुभारंभ केला.
यावेळी माजी सरपंच तथा किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे अध्यक्ष प्रसाद देवधर, विजयदुर्ग पोलीस पाटील राकेश पाटील, पुरातत्व विभागचे एकांकर, विजयदुर्ग तलाठी तानवडे, ग्रामपंचायत सदस्य दिनेश जावकर, पत्रकार बाळा कदम, सचिन लळीत, विजयदुर्ग सोसायटी चे चेअरमन महेश बिडये, ग्रामविकास मंडळाचे राजेंद्र परुळेकर, वैभववाडी कॉलेज चे प्राध्यापक पाटील सर, विविध शासकीय विभागचे अधिकारी, कर्मचारी वर्ग, सह्याद्रीचे दुर्गसेवक, शिवप्रेमी नागरिक आणि शिवप्रेमी मंडळ, यांनी स्वाक्षरी मोहिमेत आपला सहभाग दर्शविला होता.यावेळी देवगड तहसीलदार ठाकूर यांनी सुद्धा भेट देऊन आपली स्वाक्षरी करून या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.
आपला इतिहास जगाच्या काना कोपऱ्यात पोहोचण्यासाठी सर्व दुर्गसेवक, शिवप्रेमी, ट्रेकर्स, सामाजिक संस्था, मंडळ यांनी जनजागृती म्हणून आमच्या या उपक्रमा प्रमाणेच विविध प्रकारचे उपक्रम राबवून आपल्या या गडकिल्ल्यांना नामांकन कसे मिळेल यासाठी प्रयत्न करा असे आवाहन सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभाग यांनी केले आहे.