वेंगुर्ला रोटरी ऑफिस जनसेवेचे केंद्र व्हावे : माजी प्रांतपाल नासिरभाई बोरसादवाला. वेंगुर्ला येथे रोटरी क्लबच्या ऑफिसचे उद्घाटन.

वेंगुर्ला रोटरी ऑफिस जनसेवेचे केंद्र व्हावे : माजी प्रांतपाल नासिरभाई बोरसादवाला.  वेंगुर्ला येथे रोटरी क्लबच्या ऑफिसचे उद्घाटन.

वेंगुर्ला.

   वेंगुर्ला मिडटाउनच्या रोटरी ऑफिसचे उद्घाटन करताना आपणाला विशेष आनंद होत असून, हे ऑफिस वेंगुर्ल्यातील जनतेसाठी विविध प्रकारच्या रोटरी योजना व उपक्रमातून लोकांना जनसेवा देणारे केंद्र व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करीत, नवीन रोटरी क्लब ऑफिस उद्घाटनप्रसंगी माजी प्रांतपाल नासिरभाई बोरसादवाला यांनी शुभेच्छा दिल्या.
   १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनने आपल्या नवीन ऑफिस चे उद्घाटन  १५ ऑगस्ट २०२४ रोजी माजी प्रांतपाल नासिरभाई बोरसादवाला यांच्या शुभहस्ते शिरोडकर कंपाउंड, बॅरीस्टर खर्डेकर रोड, वेंगुर्ला येथे दिमाखदार सोहळ्यात संपन्न झाले.
     यावेळी रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन प्रेसिडेंट योगेश नाईक,सेक्रेटरी नोटरी ॲड.प्रथमेश नाईक, ट्रेझरर मुकूल सातार्डेकर, असिस्टंट गव्हर्नर महादेव पाटकर, सिंधुदुर्ग झोन डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी राजेश घाटवळ, सावंतवाडी रोटरी प्रेसिडेंट प्रमोद भागवत,सेक्रेटरी सुबोध शेलटकर, अनंत उचगावकर, सुहास सातोसकर, प्रविण परब,मालवण रोटरीचे सुहास ओरसकर, वेंगुर्ला रोटरीचे शंकर वजराटकर, दिलीप गिरप, गणेश अंधारी,सुनील रेडकर, प्रा.डाॅ.वसंतराव पाटोळे, दादासाहेब साळगावकर, पंकज शिरसाट, दिपक ठाकूर, अनमोल गिरप आदी उपस्थित होते.
   यावेळी रोटरी  प्रथेप्रमाणे क्लब मिटींग घेण्यात आली.
प्रमुख पाहुणे माजी प्रांतपाल नासिरभाई बोरसादवाला यांनी उपस्थितांना क्लब अधिकारी व जबाबदारी या विषयावर मार्गदर्शन केले.असिस्टंट गव्हर्नर महादेव पाटकर यांनी शुभेच्छा देत, या रोटरीवर्षात डिस्ट्रिक्ट ३१७० तर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या योजनांची माहिती दिली.सिंधुदुर्ग झोन डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी राजेश घाटवळ यांनी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर शरद पै, असिस्टंट गव्हर्नर डॉ विद्याधर तायशेटे, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी प्रणय तेली व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रोटरी क्लब मान्यवर यांचे शुभेच्छा संदेश देवून, नवीन रोटरी क्लबचे ऑफिस सुरू केल्याबद्दल रोटरी क्लब प्रेसिडेंट योगेश नाईक व सेक्रेटरी प्रथमेश नाईक यांचे अभिनंदन केले.
    यावेळी वेंगुर्ला रोटरी क्लबला प्रतिष्ठेचे डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स इव्हेंट, मल्टि डिस्ट्रिक्ट रायला व डिस्ट्रिक्ट ग्रॅंट प्रोजेक्टची सुसंधी दिल्याबद्दल माजी प्रांतपाल नासिरभाई बोरसादवाला यांचा क्लबच्यावतीने शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच माजी अध्यक्ष शंकर वजराटकर, प्रेसिडेंट योगेश नाईक, सेक्रेटरी नोटरी ॲड प्रथमेश नाईक यांचाही क्लब योगदानाबद्दल , शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.नवीन रोटरी पाॅल हॅरिस फेलो शंकर वजराटकर, सदाशिव भेंडवडे, अनमोल गिरप व योगेश नाईक यांना पीएचएफ पीन व सन्मानपत्र देऊन नासिरभाई बोरसादवाला यांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले. प्रास्ताविक व स्वागत प्रेसिडेंट योगेश नाईक, आभार सेक्रेटरी ॲड प्रथमेश नाईक व सूत्रसंचालन शंकर वजराटकर यांनी केले.