साहित्यिक प्रा.डॉ.प्रज्ञाकुमार गाथाडे यांच्या ‘गावठाण’ कथासंग्रहाला तिफन पुरस्कार जाहीर.

सिंधुदुर्ग.
साहित्यिक प्रा. डॉ. प्रज्ञाकुमार गाथाडे यांच्या 'गावठाण' कथा संग्रहास प्रसिद्ध लोककवी विठ्ठल वाघ "तिफन" पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रतिभा साहित्य संघ अकोला, महाराष्ट्र यांच्या वतीने ग्रामीण जीवनाचे सकस आणि वास्तवदर्शी लेखन करणाऱ्या नव्या दमाच्या कवी, लेखकास विदर्भातील हा मानाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात येतो."तिफन" ची प्रतिकृती, स्मृतीचिन्ह, गौरवपत्र, २१००० रोख रक्कम, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप असून. ९ व १० डिसेंबर रोजी चिखलदरा जिल्हा अमरावती येथे संपन्न होत असलेल्या चित्रांगण कला साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
यापूर्वी गावठाण कथासंग्रहास तीन पुरस्कारा प्राप्त झाले असून हा चौथा पुरस्कार आहे. याच्या यशाबद्दल आ. कपिल पाटील, सोमनाथ रोडे, अर्जुन जाधव, माधव बावणे, महेंद्र गांधले, अजय थोरात, प्रा देवदत सावंत, मिलिंद सोनकांबळे, राजेंद्र सूर्यवंशी, रमेश सोनवणे, नारायण कांबळे यांनी त्यांचे कौतुक केले आहे. डॉ.गाथाडे यांच्या 'गावठाण' कथा संग्रहाला यापूर्वी तीन पुरस्कार प्राप्त झाले आहेत.आता हा चौथा पुरस्कार जाहीर झाला आहे.