सावंतवाडी नगरपालिका मुख्याधिकारी अश्विनी पाटील यांची बदली

सावंतवाडी
सावंतवाडी येथील नगरपालिकेच्या मुख्याधिकारी अश्विनी पाटील यांची सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेत उपायुक्तपदी बदली झाली आहे. या बदलीमुळे सावंतवाडी नगरपालिकेचे मुख्याधिकारी पद रिक्त झाले आहे. पाटील यांनी आपल्या दोन महिन्याच्या कार्यकालात प्रशासनावर चांगली पकड बसवली होती. पार्किंग सुविधा, गटार सफाई यासाठी पावसाळ्यापूर्वी प्रशासनाने काही उपक्रम राबवले होते. दोन महिन्यांपूर्वी त्यांची सावंतवाडीत बदली झाली होती.