दाभोली येथे कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांकडून शेतकऱ्यांना करण्यात आले मार्गदर्शन.

दाभोली येथे कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांकडून शेतकऱ्यांना करण्यात आले मार्गदर्शन.

वेंगुर्ला.

     ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम (रावे) अंतर्गत दाभोली येथे कृषी विजय गटाने कोकण कृषी विद्यापीठाने शिफारस केलेल्या पद्धतीने बियाणे उपचाराचे प्रात्यक्षिक राबवले. हे प्रत्याक्षिक प्रसाद बोवलेकर यांच्या शेतावर घेण्यात आले असून त्यासाठी भुईमुगाचे बियाणे वापरण्यात आले. बियाण्यास थायरम, स्फुरद विरघळवणारे जिवाणू, रायझोबियम आणि ट्रायकोडर्मा चे उपचार कसे करावे व त्याचे फायदे याबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
      कृषी विद्यापीठाचे विद्यार्थ्यांनी अजिंक्य सांबारे, आतिश चव्हाण, अक्षय गावडे, अनिरुद्ध आडे, चिन्मय पाटील, गौरांग जठार, हर्ष नाईक, कौस्तुभ डिडवणे, नोएल रुके, अथर्व देवकुळे व ओमकार रंधवे यांनी प्रात्यक्षिक राबवले.प्रात्याक्षिक वेळी प्रसाद बोवलेकर, गौतम हळदणकर, मयूर पेडणेकर, नंदन बंदवलकर, पुंडलिक बोवलेकर हे शेतकरी उपस्थित होते.
   सदर प्रात्यक्षिकासाठी विद्यापीठाचे वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉ. राजेश राठोड व वेंगुर्ला फळे संशोधन केंद्राचे डॉ. मैथिलिश सणस व डॉ. विजयकुमार देसाई यांचे मार्गदर्शन लाभले.