डेगवे येथील बीएसएनएल टॉवरची बॅटरी तात्काळ बसवा; अन्यथा उपोषण छेडणार. ग्रामपंचायत सदस्य विजय देसाई यांचा इशारा.

सावंतवाडी.
बीएसएनएलची बॅटरी न बसवल्यामुळे १५ ऑगस्टला जाहीर उपोषण छेडणार असल्याचा इशारा डेगवे ग्रामपंचायत सदस्य तथा शिवसेना विभाग प्रमुख विजय शंभा देसाई यांनी दिला आहे. डेगवे गावामध्ये ४ वर्षापूर्वी बीएसएनएल चा टॉवर बसवलेला असुन गेली २ वर्ष बॅटरी चोरीला गेलेली आहे. लाईट असली तरच रेंज येते नायतर रेंज येते नसल्या कारणाने याची वेळोवेळी सावंतवाडी बीएसएनएल ऑफिसला लेखी, तोंडी निवेदन देऊन सुद्धा काही केलेले नाही. फक्त तोंडी आश्वासन दिली. १५ ऑगस्टपर्यंत बॅटरी न बसवल्यास १५ ऑगस्टला बीएसएनएल ऑफिस समोर उपोषणाला बसणार असे श्री.देसाई यांनी म्हटले आहे.
असे निवेदन जिल्हाधिकारी ओरस सिंधुदुर्गनगरी, सावंतवाडी पोलिस अधिकारी, बीएसएनएल आॅफिस, सावंतवाडी तहसीलदार कार्यालय, प्रांतधिकारी कार्यालय, बांदा पोलिस अधिकारी,शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांना देण्यात आले आहे.