शिरोड्यात 'नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान' अंतर्गत ४८ लाभार्थ्यांना मोफत चष्म्यांचे वाटप
शिरोडा
भारतीय जनता पार्टी शिरोडा युवा मोर्चाच्या वतीने 'नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान' अंतर्गत नेत्रतपासणी केलेल्या लाभार्थ्यांना मोफत चष्म्यांचे वितरण शनिवारी (दि. १ ऑगस्ट) शिरोडा येथील भाजप कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमाचा लाभ ४८ लाभार्थ्यांनी घेतला.भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्गच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या 'सेवा पंधरवडा' उपक्रमांतर्गत २९ सप्टेंबर २०२५ रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून, शासकीय नेत्रपेढी व जिल्हा रुग्णालय ओरोस यांच्या सहकार्याने शिरोडा उपजिल्हा रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्र रेडी येथे मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्या शिबिरात नेत्रतपासणी केलेल्या लाभार्थ्यांचे चष्मे उपलब्ध झाल्यानंतर त्यांचे वितरण करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजप वेंगुर्ला तालुका उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे यांनी केले. यावेळी भाजप वेंगुर्ला तालुकाध्यक्ष विष्णू परब आणि जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांनी अभियानाचे महत्त्व विशद करत लाभार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाला आसोली पंचायत समिती सदस्य संकेत धुरी, तालुका चिटणीस श्रीकृष्ण धानजी, वेंगुर्ला तालुका युवा मोर्चा सरचिटणीस राहुल गावडे, शिरोडा शक्ती केंद्र प्रमुख मयूरेश शिरोडकर, सोमाकांत सावंत, महादेव नाईक, माजी सरपंच मनोज उगवेकर, अभय बर्डे, चंद्रशेखर गोडकर, महिला मोर्चाच्या गंधाली करमळकर, समृद्धी धानजी, स्नेहा गोडकर, पल्लवी नाईक, विजय बागकर, बाळू वस्त, अनिल गावडे, तुषार म्हाकले, मारुती दोडशानट्टी तसेच शिरोडा भाजप युवा नेते संतोष धानजी उपस्थित होते.याशिवाय सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, भाजप वेंगुर्ला तालुका युवा मोर्चा अध्यक्ष प्रणव वायंगणकर, वेंगुर्ला नगरपरिषद नगरसेवक प्रितम सावंत, भाजप पदाधिकारी तुषार साळगांवकर आणि माजी शिरोडा सरपंच विजय पडवळ यांनीही कार्यक्रमास भेट देऊन लाभार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.या उपक्रमांतर्गत नेत्रतपासणी केलेल्या ४८ लाभार्थ्यांना मोफत चष्म्यांचे वितरण करण्यात आले. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत केले.
konkansamwad 
