भाजपचे माजी शक्ती केंद्रप्रमुख जगदीश पांगे यांनी हाती घेतली मशाल

भाजपचे माजी शक्ती केंद्रप्रमुख जगदीश पांगे यांनी हाती घेतली मशाल


मालवण
       मालवण तालुक्यातील आचरा येथील भाजपचे माजी शक्ती केंद्रप्रमुख जगदीश पांगे यांनी कार्यकर्त्यांसमवेत भाजपला सोडचिठ्ठी देत श्री. छोटू पांगे यांच्या माध्यमातून मंगळवारी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे.भाजपमधील अंतर्गत गटबाजीला कंटाळून आणि आमदार वैभव नाईक यांनी आचरा मध्ये केलेल्या विकास कामांना प्रेरित होऊन  आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश करत असल्याचे जगदीश पांगे यांनी यावेळी सांगितले तसेच आ.वैभव नाईक यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मताधिक्य देण्याचा निर्धार श्री पांगे यांनी यावेळी केला आहे. 
       यावेळी आचरा उपशहरप्रमुख छोटू पांगे, अशोक गोलतकर, सत्यवान पांगे,कल्पेश माने,बंड्या पवार,संजू गोलतकर,वसंत आचरेकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.