साटेली-भेडशी येथील ऑर्थोपेडिक शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त शिबिराचे आयोजन.

साटेली-भेडशी येथील ऑर्थोपेडिक शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.  शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त शिबिराचे आयोजन.

दोडामार्ग.

   सलग चौथ्या दिवशी ऑर्थोपेडिक शिबिर घेण्यात आले. साटेली-भेडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या शिबिरामध्ये दोनशे पंचवीसहून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली.
   गेले चार दिवस पुण्यातील लोकमान्य हॉस्पिटल, शिवसेना सावंतवाडी व दिपक केसरकर मित्रमंडळ यांच्यावतीने हे ऑर्थोपेडिक शिबिर वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केले जात आहे. या शिबिरास नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.त्यामुळे आयोजनाचे उद्दिष्ट साध्य झाल्याची भावना आयोजकांकडून व्यक्त होत आहे.
   यावेळी लोकमान्य हॉस्पिटलचे डॉक्टर्स, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेंद्र निंबाळकर, तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, तालुकासंघटक गोपाळ गवस, युवासेना तालुकाप्रमुख भगवान गवस, महीला उपजिल्हाप्रमुख मनिषा गवस, महीला तालुकाप्रमुख चेतना गडेकर  आदींसह विविध पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.