वेंगुर्ला मानसीश्वर खाडीत आढळला तरुणाचा मृतदेह

वेंगुर्ला मानसीश्वर खाडीत आढळला तरुणाचा मृतदेह

वेंगुर्ला

 

   येथील मानसीश्वर पुलानजीक असलेल्या खाडीपात्रात ३५ वर्षीय तरूणाचा मृतदेह तरंगत्या अवस्थेत आढळून आला. संबंधित व्यक्ती कोण? हे उशिरापर्यंत समजू शकले नाही. दरम्यान तो मृतदेह पोलिसांनी बाहेर काढला असून उर्वरित तपासणीसाठी पाठवून देण्यात आला आहे. यात अधिक माहिती अशी की काही नागरिकांनी मानसीश्वर खाडी परिसरात एक मृतदेह तरंगत्या अवस्थेत दिसत असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी त्या ठिकाणी धाव घेऊन तो मृतदेह ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढला. यावेळी कॉन्स्टेबल भगवान चव्हाण, हवालदार योगेश राऊत, दीपा मठकर, पांडुरंग खडपकर, मनोज परूळेकर आदी उपस्थित होते. संबंधित व्यक्ती नेमकी कोण? हे उशिरापर्यंत समजू शकले नाही. त्या मृत व्यक्तीच्या अंगावर निळसर-काळसर रंगाचे हाफ शर्ट, जीन्स असा पेहराव आहे. या प्रकरणात पुढील तपास सुरू आहे.