कुडाळ व मालवण आगारासाठी 43 नवीन एसटी बसेस उपलब्ध करून द्याव्यात. आमदार निलेश राणे यांची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

कुडाळ व मालवण आगारासाठी 43 नवीन एसटी बसेस उपलब्ध करून द्याव्यात.  आमदार निलेश राणे यांची परिवहन मंत्र्यांकडे मागणी


कुडाळ 
    कुडाळ व मालवण आगारासाठी 43 नवीन एसटी बसेस मिळाव्यात. अशी मागणी आमदार निलेश राणे यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली आहे. सदर निवेदनात असे म्हटले आहे की माझ्या मतदार संघातील राज्य परिवहन महामंडळाच्या कुडाळ व मालवण आगारातील अनेक बस नादुरुस्त असून यामुळे ग्रामीण भागातील अनेक फेऱ्या रद्द करायची वेळ आली आहे. यामुळे शाळकरी मुले व नोकरीनिमित्त प्रवास करणारे नागरीक, महिला, वृद्ध यांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागत आहे. तरी सदरील प्रश्नांचा गांभीर्यपूर्वक विचार करत माझ्या मतदार संघातील कुडाळ आगारासाठी किमान २५ तर मालवण आगरासाठी किमान १८ अश्या एकूण ४३ नविन एसटी बस उपलब्ध करून देऊन सहकार्य करावे. अशी मागणी आमदार निलेश राणे यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली आहे.