वेंगुर्ला आनंदवाडी येथील आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.

वेंगुर्ला आनंदवाडी येथील आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.

वेंगुर्ला.

   आनंदवाडी येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती,तालुका वेंगुर्ला शहर, सावित्रीबाई फुले महिला मंडळ आनंदवाडी, सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघ मुंबई शाखा तालुका वेंगुर्ला, दलित समाज सेवा मंडळ आनंदवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने माधवबाग शाखा कुडाळ आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.यावेळी ७० जणांनी शिबिराचा लाभ घेतला.यात रुग्णांची ईसीजी, शुगर व इतर तपासणी करण्यात आली.यावेळी माधावबाग कुडाळ येथील टीमने रुग्णांची तपासणी केली.
    या शिबिराचे उद्घाटन वेंगुर्ला आगार व्यवस्थापक राहुल कुंभार, सेवानिवृत्त जिल्हा न्यायालय अधीक्षक एन.पी.मठकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी महात्मा ज्योतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले.
    यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती अध्यक्ष विठ्ठल जाधव, उपाध्यक्ष गजानन जाधव, उपाध्यक्षा मोनाली जाधव.सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघ तालुकाध्यक्ष प्रेमानंद जाधव,सचिव जयंत जाधव, दलित सेवा मंडळ अध्यक्ष सुहास जाधव, सावित्रीबाई महिला मंडळ अध्यक्षा सुहानी जाधव, सचिव वृषाली जाधव, कार्याध्यक्ष लाडू जाधव, सल्लागार वाय.जी.कदम, वामन कांबळे, सुरेश जाधव तसेच माधवबाग शाखा कुडाळचे डॉ. अमेय पाटकर, डॉ. समिक्षा रहाटे, राकेश सोनवडेकर, कृतिका सपकाळ, निशा पावसकर, संदीप चेंदवणकर आदी उपस्थित होते.