खर्डेकर महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर परबवाडा ग्रामपंचायत येथे संपन्न.

खर्डेकर महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर परबवाडा ग्रामपंचायत येथे संपन्न.

वेंगुर्ला.

  येथील बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ला राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर परबवाडा ग्रामपंचायत येथे हा कॅम्प आयोजित करण्यात आला होता. दिनांक 18 डिसेंबर  ते 24 डिसेंबर दरम्यान हा कॅम्प पार पडला.
  यावेळी बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. एम. बी. चौगले,माजी प्राचार्य आनंद बांदेकर मुख्याधिकारी वेंगुर्ला परितोष कंकाळ, परबवाडा सरपंच श्रीमती शमिका बांदेकर, उपसरपंच पपू परब, ग्रामपंचायत सदस्य  हेमंत गावडे, संतोष सावंत, सुहिता हळदनकर, स्वरा देसाई, कार्तिकी पवार, अरुणा गावंडे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा सदाशिव चुकेवाड, प्रा.डाॅ सुनिल भिसे, प्रा.डाॅ.डी एस पाटील, व्ही.व्ही.सावंत तसेच सदस्य एल.बी.नैताम प्रा.डॉ.वसंतराव पाटोळे, प्रा.ए.बी.नरगच्चे प्रा.ए.एस.कदम, प्रा.पी.आर.गावडे, प्रा.एम.आर.नवत्रे, प्रा डाॅ  बि.जी.गायकवाड, श्री.डी.जे.शितोळे तसेच ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. 
        या कॅम्पमध्ये महाविद्यालयाने विशेष असे उपक्रम राबवले. त्यात मंगळवार दिनांक 19 रोजी परबवाडा ग्रामपंचायत कणकेवाडी परिसरातील रस्ते स्वच्छ करण्यात आली तसेच दिनांक 20 रोजी कणकेवाडी, पवारवाडी, कांबळीवाडी परिसरातील 18 शोषखड्डे खोदण्यात आले.दिनांक 21 रोजी कणकेवाडी येथे एक बंधारा,व परबवाडा आडारी पुलाखाली दुसरा बंधारा असे दोन बंधारे पुर्ण केले. दिनांक 22 रोजी कॅम्पच्या पाचव्या दिवशी विद्यार्थ्यांनी गावातील सर्व मंदिराची स्वच्छता केली.दिनांक 23 सहाव्या दिवशी विद्यार्थ्यांनी गावातील कणकेवाडी, पवारवाडी,कांबळीवाडी जाऊन आर्थिक सर्वेक्षण करण्यात आले. कार्यक्रम आधिकारी प्रा.सदाशिव चुकेवाड, प्रा.डाॅ सुनिल भिसे, प्रा.डाॅ.डी एस पाटील, सौ. व्ही.व्ही.सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सर्व कामे पार पाडली. 
     या शिबिराचा समारोप दिनांक 24 रोजी पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्रा.डाॅ. एम. बी. चौगले होते. प्रमुख उपस्थित परबवाडा ग्रामपंचायत  सरपंच मा. श्रीमती शमिका बांदेकर,उपसरपंच श्री पपू परब ग्रामपंचायत सदस्य  हेमंत गावडे, संतोष सावंत, सुहिता हळदनकर, स्वरा देसाई, कार्तिकी पवार, अरुणा गावंडे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी  प्रा.डाॅ सुनिल भिसे, सौ. व्ही.व्ही.सावंत होते.
  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सौ. व्ही.व्ही.सावंत यांनी केले तर आभार प्रदर्शन कार्यक्रम आधिकारी प्रा सदाशिव चुकेवाड यांनी मानले.