सावंतवाडीत जखमी भारद्वाज पक्षाला मिळाले जीवदान
सावंतवाडी
न्यू खासकीलवाडा येथे जखमी अवस्थेत आढळलेल्या भारद्वाज पक्षाला वनविभागाने जीवदान दिले. न्यू खासकीलवाड्यातील रहिवासी वेलेरियन फुडतडू यांना हा पक्षी आढळून आला होता. त्यांनी तातडीने उबाठा ठाकरे गटाचे युवा सेना तालुकाप्रमुख आशिष सुभेदार यांना माहिती दिली. सुभेदार यांनी वनविभागाला पाचारण केले आणि पक्षाला त्यांच्या ताब्यात दिले. वनरक्षक अमृतकर आणि फाटक यांनी त्वरित घटनास्थळी दाखल होत पक्षाला वाचविण्यासाठी प्रयत्न केले. जखमी पक्षाला पुढील उपचारासाठी नेले गेले यावेळी सुभेदार यांनी वनविभागाच्या कर्मचार्यांचे आभार मानले. भारद्वाज हा सावंतवाडी शहराचा पक्षी म्हणून ओळखला जातो. त्याचे दर्शन शुभ मानले जाते. या पक्ष्याचे एक उत्तम शिल्प सावंतवाडीच्या सेल्फी पॉईंटवर उभारण्याची मागणीही करण्यात आली आहे.

konkansamwad 
