पंडित दीनदयाळ प्रशिक्षण अभियानात सिंधुदुर्ग भाजपा अव्वल....कोकण-ठाणे विभागात ९५% उपस्थितीसह प्रथम क्रमांक
मुंबई
पंडित दीनदयाळ उपाध्याय महाप्रशिक्षण अभियान 2026 अंतर्गत सिंधुदुर्ग भाजपाच्या जिल्हा प्रशिक्षण वर्गाचा अहवाल प्रदेश सरचिटणीस आमदार योगेश सागर यांना सुपूर्द करण्यात आला. जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत व जिल्हा संयोजक प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांनी हा अहवाल दिला. प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत राज्यातील मंडल व जिल्हा प्रशिक्षण वर्गाचा आढावा घेण्यात आला. कोकण-ठाणे विभागातील 187 मंडलांपैकी सिंधुदुर्गने 95% उपस्थिती व नोंदणी शुल्क भरून विभागात प्रथम क्रमांक पटकावला. याबद्दल जिल्ह्याचे विशेष कौतुक करण्यात आले.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 14 संघटन मंडलांत 1115 प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला. मालवण-चौके येथील नॅनीज ग्रॅड रिसोर्टमध्ये 23 व 24 मे रोजी झालेल्या जिल्हा प्रशिक्षण वर्गात अपेक्षित 143 पैकी 136 पदाधिकाऱ्यांनी निवासी सहभाग नोंदवला व ऑनलाइन शुल्क जमा केले.या वर्गास प्रदेश सरचिटणीस आमदार योगेश सागर, आमदार प्रशांत ठाकूर, प्रदेश सहसंयोजिका प्रा. वर्षा भोसले, आमदार प्रमोद जठार, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, रवींद्र साठे, अभिजीत सामंत, जयंत जाधव, सोशल मीडिया प्रमुख सागर भदये, मुंबई भाजप सरचिटणीस राजेश शिरवाडकर यांचे मार्गदर्शन लाभले. पालकमंत्री नितेश राणे यांनीही वर्गास भेट देऊन मार्गदर्शन केले.जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा संयोजक प्रसन्ना देसाई, सहसंयोजक प्रमोद रावराणे, संध्या तेरसे व श्रीकृष्ण परब यांच्या टीमने घेतलेल्या मेहनतीमुळे वर्ग यशस्वी झाला.
konkansamwad 
