खर्डेकर महाविद्यालयाच्या स्वयंसेवकांनी दोन दिवसात बांधले दोन वनराई बंधारे.

खर्डेकर महाविद्यालयाच्या स्वयंसेवकांनी दोन दिवसात बांधले दोन वनराई बंधारे.

वेंगुर्ला.

   येथील बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे परबवाडा येथे सात दिवसाचे निवासी शिबीर 18 डिसेंबर पासून सुरू झाले आहे. या शिबिरादरम्यान स्वयंसेवकांनी दोन दिवसात कणकेवाडी येथे एक बंधारा,व परबवाडा आडारी पुलाखाली दुसरा बंधारा असे दोन बंधारे पुर्ण केले. 
      पाण्याची उपलब्धता दिवसेदिवस कमी होत असल्याने जलसंवर्धन ही आजच्या काळाची गरज बनलेली आहे. विद्यार्थ्यांनी बंधारे बांधून जलसंवर्धनाचा संदेश कृतीतून दिला.वेंगुर्ला  तालुका कृषी अधिकारी मान. निरंजन देसाई , तंत्र सहायक मान. गव्हाणे कृषी सहायक श्री जीवन परब, श्री.श्रद्धा वाडेकर यांनी स्वयंसेवकाच्या  कामाचे कौतुक केले.

 यावेळी परबवाडा सरपंच श्रीमती शमिका बांदेकर,उपसरपंच श्री पप्पू परब ग्रामपंचायत सदस्य हेमंत गावडे, संतोष सावंत, श्रीमती सुहिता हळदनकर, श्रीम. स्वरा देसाई, श्रीम. कार्तिकी पवार, श्रीमती अरुणा गवंडे तसेच ग्रामस्थ, मानवले फर्नांडिस, समीर चिंदरकर यांनी बंधाऱ्यांना भेट देऊन स्वयंसेवकांना प्रोत्साहन दिले.

  यावेळी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा.एस.जी.चुकेवाड, प्रा.डॉ.सुनील भिसेप्रा. डॉ. डी.एस. पाटील, प्रा.सौ व्ही.व्ही.सावंत तसेच सदस्य एल.बी. नैताम प्रा.डॉ.वसंतराव पाटोळे, प्रा.ए.बी.नरगच्चे प्रा.ए.एम. प्रा.एस.एस.दिक्षित यांच्यासह सर्व स्वयंसेवक उपस्थित होते.