अहमदनगरमध्ये एसटी बस-कारचा भीषण अपघात; ४ जण ठार तर ३ जण जखमी.
अहमदनगर.
अहमदनगर येथे आज रविवारी एसटी बस आणि कारचा भीषण अपघात झाला आहे.ओव्हरटेक करण्याच्या नादात कार बसला जाऊन समोरासमोर धडकली.हा अपघात एवढा भीषण होता की दोन्ही वाहनांचा यात चक्काचूर झाला. हा अपघात श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगाव जवळ झाला. या भीषण अपघातात ४ जण ठार झाले आहेत तर ३ जण जखमी झाले आहेत. या अपघतामुळे या मार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीगोंदा येथून एक एसटीबस ही शिरूरला जाण्यासाठी आज सकाळी निघाली होती. ही बस नगर कल्याण मार्गाने जात असतांना ढवळगाव येथे भरधाव वेगात असणाऱ्या एका इर्टिगा कारने एका वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यावेळी समोरून येणाऱ्या एसटी बसला ही कार धडली. हा अपघात ऐवढा भीषण होता की दोन्ही वाहनांचा यात चक्काचूर झाला. या अपघातात दोघांचा जागेवरच तर दोघांचा रुग्णालयात उपचार सुरू असतांना मृत्यू झाला.
या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने याची माहिती पोलिसांना देत बचाव कार्य राबवण्यास जखमी आणि मृत नागरिकांना तातडीने वाहनातून बाहेर काढण्यात आले. घटनास्थळी मोठा आक्रोश सुरू होता. मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने आणि अपघातामुळे या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी देखील तातडीने घटनास्थळी येत जखमी नागरिकांना रुग्णवाहिकेच्या साह्याने दवाखान्यात दाखल केले. दरम्यान, बस मधून १६ प्रवासी प्रवास करत होते. हे सर्व प्रवासी सुखरूप आहेत. अपघातात कारचा चुराडा झाला आहे. एसटी बसच्या समोरच्या भागाचे देखील मोठे नुकसान झाले आहे.