कणकवली येथे विद्यार्थ्यांना ग्राहक कायद्याचे मार्गदर्शन.
कणकवली.
विद्यामंदिर माध्यमिक प्रशाले मध्ये ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा कणकवलीच्या वतीने विद्यार्थांना ग्राहक चळवळीची माहिती विविध कायद्याच्या आधारे दिली. ग्राहक आणि दुकानदार यांच्यामध्ये समन्वय नसल्यामुळे अनेक वस्तूच्या खरेदीमध्ये भेसळ आढळून येथे ग्राहक फसला जातो त्याची पिळवणूक होते.अर्थिक कुचंबना निर्माण होते यासाठी ग्राहकानी नेहमी जागृत रहाणे महत्वाचे आहे.ग्राहक पंचायत आणि ग्राहक याविषयी सुगम माहिती ग्राहक पंचायतीची माहिती सदस्यांनी दिली. सौ श्रद्धा कदम मॅडम यांनी ग्राहक पंचायत आणि कायदा याविषयी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना जागृत केले सौ.सय्यद, पूजा सावंत, सौ.कामत.श्री. दादा कुडतरकर यांनी ग्राहक कायदा आणि जागृत नागरिक या विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक पी. जे. कांबळे, यांनी ग्राहक चळवळी विषयी माहिती पर प्रास्ताविक करून मार्गदर्शकांचे स्वागत केले.पर्यवेक्षिका सौ.जाधव, श्री.राणे, श्री. ठाकूर, शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आभार जे जे शेळके यांनी मानले.