मनसेच्या सावंतवाडी शहर अध्यक्षपदी ॲड.राजू कासकर तर तालुका सचिवपदी सतीश आकेरकर यांची नियुक्ती.
सावंतवाडी.
मनसे अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आज सावंतवाडी शहर अध्यक्ष पदी ॲड.राजू कासकर यांची तर सावंतवाडी तालुका सचिव पदी सतीश आकेरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.या बाबतची घोषणा जिल्हाध्यक्ष अँड. अनिल केसरकर यांनी केली.दरम्यान या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे उपजिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ, तालुका अध्यक्ष मिलिंद सावंत व अन्य पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. लवकरच पक्षाची उर्वरीत कार्यकारणी जाहिर करण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष ॲड.अनिल केसरकर यांनी सांगितले आहे.