शिवसेना पक्षातर्फे म्हापण जिल्हा परिषद मतदारसंघात ‘मोफत छत्री वाटप’ कार्यक्रम

शिवसेना पक्षातर्फे म्हापण जिल्हा परिषद मतदारसंघात ‘मोफत छत्री वाटप’ कार्यक्रम

वेंगुर्ला


          पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सोयीसाठी शिवसेना पक्षातर्फे म्हापण जिल्हा परिषद मतदारसंघात मोफत छत्री वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शिवसेना विभाग प्रमुख कुणाल सरमळकर यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला असून परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.या कार्यक्रमाचे आयोजन शनिवार, 13 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता करण्यात आले असून कार्यक्रमाचे ठिकाण शरयू मंगल कार्यालय, पाट हायस्कूल समोर असे आहे.कार्यक्रमाला विविध मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून, शिवसेना पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.यावेळी जिल्हा परिषद सदस्या सौ. यज्ञा देवदत्त साळगावकर, पंचायत समिती उपसभापती श्री. सचिन देसाई तसेच शिवसेनेचे विविध पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.