डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कणकवलीत अभिवादन भीमपोवाड्याने सामाजिक समता सप्ताहाची सांगता

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कणकवलीत अभिवादन भीमपोवाड्याने सामाजिक समता सप्ताहाची सांगता

कणकवली

 

      भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कणकवली येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.या प्रसंगी उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर, तहसिलदार दिक्षांत देशपांडे, सहायक आयुक्त संतोष चिकणे, समाज कल्याण अधिकारी तुषार गवळी, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक गणेश हुक्कीरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थितांनी डॉ. आंबेडकर यांच्या कार्याचा व विचारांचा गौरव करत सामाजिक समतेचा संदेश दृढ करण्याचा निर्धार व्यक्त केला.यावेळी ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहा’ची सांगता आप्पासाहेब पटवर्धन चौक येथे करण्यात आली. लोकशाहीर आझाद नाईकवडी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या दमदार भीमपोवाड्याने वातावरण भारावून गेले. त्यांच्या गीतांमधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनाचा आणि समाजपरिवर्तनाच्या विचारांचा प्रभावी आढावा मांडण्यात आला.