आंदोलनाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडविण्याची जबाबदारी आता आपली- वैभव नाईक
मालवण
देशात महागाई वाढली आहे.स्पर्धा परीक्षांचे पेपर फुटत आहेत.अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या देणगीत शेकडो कोटींची चोरी झाली.सिंधुदुर्गात स्मार्ट वीज मीटर, अणुऊर्जा प्रकल्प जबरदस्तीने लादले जात आहेत. जनतेला सुरळीत वीज पुरवठा मिळत नाही. लाडकी बहिणी योजनेतुन हजारो महिलांना वगळण्यात आले असून योजनेचे पैसे मिळत नाहीत.अर्धवट कामे करून ठेकेदार कामाचे सर्व बिले काढत आहेत.अवैध धंदे आणि कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर नियंत्रण ठेवण्यात केंद्रातील आणि राज्यातील भाजप महायुती सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे.शासनाच्या निधीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून जनतेचे पैसे खासदार,आमदार फोडण्यासाठी वापरले जात आहेत. जनतेचे प्रश्न सोडविण्यापेक्षा खासदार, आमदार फोडण्यात सरकारला जास्त रस आहे. त्यामुळे सरकारवर जनतेचा प्रचंड रोष आहे. जनतेच्या प्रश्नांकडे महायुती सरकार दुर्लक्ष करीत असल्यामुळे आंदोलनाच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडून ते प्रश्न सोडविण्याची जबाबदारी आता विरोधक म्हणून आपली आहे. अशी टीका माजी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख, माजी आमदार वैभव नाईक यांनी काल बुधवारी मालवण तालुक्यातील आडवली मालडी, सुकळवाड, मसुरे,आचरा या चार जिल्हा परिषद विभागातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची विभागवार बैठक घेत संघटनेचा आढावा घेतला. संघटना वाढीबाबत मार्गदर्शन केले. तसेच मतदार यादी पुनर्निरिक्षण(S.I.R.) अभियानात शिवसेनेच्या बीएलए यांनी मतदारांपर्यंत पोहचून सक्षमपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. आचरा येथील वीज वितरण कार्यालयात आणि सबस्टेशन मध्ये सहाय्यक अभियंता व उपअभियंता ही पदे आठ दिवसात भरली गेली नाही तर वीज वितरण कार्यालयाला टाळे ठोको आंदोलन करण्याचे बैठकीत ठरविण्यात आले.याप्रसंगी मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, कुडाळ विधानसभाप्रमुख संग्राम प्रभुगावकर, उपतालुकाप्रमुख उदय दुखंडे, उपतालुकाप्रमुख बाबा सावंत, युवासेना उपतालुकाप्रमुख अमित भोगले, विभागप्रमुख समीर लब्दे, अमित फोंडके, विजय पालव,अमोल वस्त, नारायण कुबल, रुपेश वर्दम, विभाग संघटक मंगेश टेमकर, आडवली येथे प्रशांत सावंत, विश्वास आचरेकर, युवराज मेस्त्री, सुभाष धुरी, सचिन कुमामेकर, सुधीर कदम, विठ्ठल घाडी, विजय परब,प्रवीण सावंत, विलास घाडी, लक्ष्मण घाडीगावकर, मनोज राऊत, प्रवीण परब, पंढरी घाडीगावकर, मसुरे येथे राहुल सावंत,दिलीप परब,जीवन कांदळगावकर, मयूर करंगुटकर, आबा परब, गोपाळ भोगले, नारायण परब, संतोष अमरे, चिंतामणी मयेकर, सुरेश मापारी,सुकळवाड येथे प्रणय मयेकर, प्रल्हाद वायंगणकर, दिगंबर सावंत, राजू गावडे, विकास परब,सतीश घाडीगावकर आनंद चिरमुले, राजू नाडकर्णी,भाऊ परब, आचरा येथे सचिन रेडकर, माणिक राणे, लवू मालडकर, श्यामसुंदर घाडी,रंजन प्रभू, प्रसाद टोपले, मिथुन माळगावकर, प्रथमेश घाडी, दिनेश साळकर,राजेंद्र घाडी, सुनील माळकर,परेश तारी, लक्ष्मण मेस्त्री,संजय सामंत, अर्चन पांगे यांसह त्या त्या विभागातील शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
konkansamwad 
