क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचे ७४ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन

क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचे ७४ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन


मुंबई 


         जेष्ठ क्रीडा समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचे वयाच्या ७४व्या वर्षी दीर्ष आजाराने गुरुवारी निधन झाले. ३ डिसेंबरला त्यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टवरून प्रकृतीची माहिती दिली होती आणि आज अचानक त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच क्रीडाविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे संझगिरी हे एक स्तंभलेखक, लेखक, सूत्रसंचालक होते. जवळजवळ ५० वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक मासिके आणि वर्तमानपत्रांसाठी प्रामुख्याने मराठीत आणि काही इतर प्रादेशिक भाषांमध्ये तसेच इंग्रजीमध्येही स्तंभलेखन केले आहे.द्वारकानाथ संझगिरी यांचा जन्म मुंबईतील दादर (पूर्व) येथील हिंदू कॉलनीत झाला. त्यांनी किंग जॉर्ज स्कूल (आता राजा शिवाजी विद्यालय म्हणून ओळखले जाणारे)आणि रामनारायण रुईया कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. पुढे त्यांनी व्हीजेटीआय माटुंगा येथून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये बीई केले. द्वारकानाथ संझगिरी हे बृहन्मुंबई महानगरपालिकेत अभियंता म्हणून काम सुरू केले आणि २००८ मध्ये पाणीपुरवठा प्रकल्पांचे मुख्य अभियंता म्हणून निवृत्त झाले. त्याबरोबर त्यांनी क्रिकेटवरील लिखाण सुरू ठेवले होते. ३ डिसेंबरला त्यांनी त्यांच्या प्रकृतीबाबत फेसबूकवर पोस्ट लिहिली होती.

 

 

त्यांनी लिहिलेली मराठी पुस्तक पुढीलप्रमाणे 

शतकात एकच - सचिन
चिरंजीव सचिन
दिलखुलास बातचीत क्रिकेटपटूंशी
खेलंदाजी
बोलंदाजी
चॅम्पियन्स
चित्तवेधक विश्वचषक २००३
क्रिकेट कॉकटेल
क्रिकेट वर्ल्ड कप हायलाईट्स
कथा विश्वचषकाच्या
लंडन ऑलिम्पिक
पॉवर प्ले
स्टंप व्हिजन
संवाद लिजंड्सशी
स्टंप व्हिजन/क्रिकेट गाथा
थर्ड अंपायर
इंग्लिश ब्रेकफास्ट