भाजयुमो आयोजित ‘नमो चषक’ अंतर्गत जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत मुकुंद तळेकर तर महिला एकेरीत सुफीया शेख वेजेता.

भाजयुमो आयोजित ‘नमो चषक’ अंतर्गत जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत मुकुंद तळेकर तर महिला एकेरीत सुफीया शेख वेजेता.

वेंगुर्ला.

   नमो चषक जिल्हास्तरीय बॕडमिंटन स्पर्धा वेंगुर्ले येथील नगरपरिषद पॅव्हेलीयन हाॅल मध्ये दि. १७ व १८ जानेवारी रोजी उस्फुर्त प्रतिसादात पार पडली.या स्पर्धेचे उद्घाटन भाजपा युवा मोर्चा प्रदेश  उपाध्यक्ष प्रथमेश तेली यांच्या हस्ते पार पडले. यावेळी भाजपा वेंगुर्ला तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, विधानसभा क्रिडा आघाडी प्रमुख निशू तोरसकर, तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर, वेंगुर्ला माजी नगराध्यक्ष राजन गिरप, सोशल मिडिया प्रमुख केतन आजगांवकर, चिफ रेफ्री रविंद्र प्रभूदेसाई आदी उपस्थित होते. तर या स्पर्धेचा बक्षिस समारंभ भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई व माजी नगराध्यक्ष राजन गिरप यांच्या हस्ते पार पडले. यावेळी विधानसभा संयोजक हेमंत गावडे, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष भुषण आंगचेकर, युवा शहराध्यक्ष प्रणव वायंगणकर, भाजपा सोशल मिडिया प्रमुख केतन आजगांवकर, रविंद्र प्रभुदेसाई, नंदकुमार प्रभुदेसाई, उमेश नाटेकर, हमिद शेख, श्रीकांत सामंत आदी उपस्थित होते. स्पर्धेत एकूण ८९ स्पर्धकांनी भाग घेतला.

 नमो चषक जिल्हास्तरीय बॕडमिंटन स्पर्धेचे निकाल खालीलप्रमाणे-

 पुरुष  एकेरी प्रथम -क्रमांक मुकुंद तळेकर.
 पुरुष एकेरी द्वितीय- क्रमांक स्वप्निल सावंत.
 पुरुष दुहेरी प्रथम-  क्रमांक निखील गवळी व अथर्व पोरे
 पुरुष दुहेरी द्वितीय-  क्रमांक अनमोल गिरप व ऋषिकेश रेडकर.

 महिला एकेरी प्रथम - क्रमांक सुफीया शेख
 महिला एकेरी द्वितीय- क्रमांक श्रेया सामंत
 महिला दुहेरी प्रथम- क्रमांक सुफिया शेख व गौराई खवणेकर
 महिला दुहेरी द्वितीय- क्रमांक सबा  शेख व तबस्यूम शेख. यातील विजेते व उपविजेते यांना खालीलप्रमाणे बक्षिसे देण्यात आली.
   पुरुष  व महिला एकेरी साठी विजेते यांना ३००० व ट्रॉफी तर उपविजेते यांना २००० व ट्रॉफी.पुरुष व महिला दुहेरी साठी विजेते यांना ४००० व प्रत्येकी एक ट्रॉफी तर उपविजेते यांना ३००० व प्रत्येकी एक ट्रॉफी.माजी आमदार राजन तेली व युवा प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश तेली यांनी सर्व विजेते, उपविजेते यांचे अभिनंदन केले. या स्पर्धे साठी रेफ्री म्हणून रविंद्र प्रभुदेसाई, केतन आजगांवकर, अजित धारगळकर, नंदकुमार प्रभुदेसाई यांनी काम पाहिले.