सिंधुदुर्गातील ८ शिक्षकांच्या प्रलंबित समस्यांवर आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या पुढाकाराने तोडगा

सिंधुदुर्गातील ८ शिक्षकांच्या प्रलंबित समस्यांवर आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या पुढाकाराने तोडगा

सिंधुदुर्गनगरी

 

 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या समस्यांवर कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या पुढाकाराने तोडगा निघाला. 8 जून 2026 रोजी शिक्षणाधिकारी माध्यमिक श्री. किंजवडेकर यांच्या दालनात झालेल्या बैठकीत 8 शिक्षकांच्या तात्काळ मान्यता देण्यात आल्या.जिल्ह्यातील सर्वच शिक्षक संघटना व शिक्षक समस्याग्रस्त असल्याने आमदार म्हात्रे सर नेहमी चिंतेत होते. तत्कालीन शिक्षणाधिकारी यांची उचलबांगडी केल्यानंतर त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन शिक्षणाधिकारी यांच्याकडे बैठक बोलावली व शिक्षकांना समस्या घेऊन येण्यास सांगितले होते. 

तात्काळ मान्यता मिळालेले शिक्षक

1. सौ. संध्या पंढरी मुणगेकर - मिलिग्रीस हायस्कूल, सावंतवाडी : पर्यवेक्षक पदाची मान्यता 
2. राजाराम संभाजी तोरस्कर - कुडाळ हायस्कूल, कुडाळ : वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव मान्य 
3. दत्त नारायण प्रभू खानोलकर - मिलिग्रीस हायस्कूल, सावंतवाडी : वैयक्तिक मान्यता 
4. शर्वरी चंद्रकांत जाधव - महात्मा गांधी विद्यामंदिर, सातोर्डे : अनुकंपा नियुक्त सहाय्यक शिक्षक मान्यता 
5. वैभव पांडुरंग कोंडस्कर - कुडाळ हायस्कूल, कुडाळ : वरिष्ठ वेतनश्रेणी मान्य 
6. विनोद शिवाजी चौगुले - शिरगाव हायस्कूल, देवगड : वरिष्ठ वेतनश्रेणी मान्य 
7. श्रद्धा नितीन पराडकर - कलबिस्त न्यू इंग्लिश स्कूल, सावंतवाडी : वरिष्ठ वेतनश्रेणी मान्य 
8. अरविंदराव राणे विद्यालय, वैभववाडी : रोस्टर तपासणीकरिता शिफारस पत्र 

    उर्वरित शिक्षकांच्या समस्या लवकरात लवकर सोडवण्याचे व जिल्ह्यात चांगले काम करण्याचे आश्वासन शिक्षणाधिकारी किंजवडेकर यांनी दिले. "सिंधुदुर्गात सक्षम अधिकारी आले असून शिक्षकांच्या समस्या सुटतील," असा विश्वास आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी व्यक्त केला. शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांनीही तत्परतेने प्रश्न निकाली काढले.यावेळी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष वामन तर्फे, सचिव घावरे सर, उपाध्यक्ष रवींद्र सावंत, मार्गदर्शक गुरुदास कुसगावकर, सुभाष खरात, माजी सभापती गुरुनाथ पेडणेकर, कणकवली तालुका अध्यक्ष शरद चोडणकर, भाजपा शिक्षक आघाडीचे सुरेश चौकेकर, माजी मुख्याध्यापिका स्वाती वालावलकर, शिक्षकेतर प्रतिनिधी आप्पा लांबोरे, शिव छत्रपती शिक्षक संघटनेचे सतीश तवटे यांच्यासह राजेश पाटकर, राहुल कदम, विजया सावंत, योगेश चव्हाण, सत्यवान परब, साईप्रसाद वेंगुर्लेकर, रमेश कविटकर, चैतन्य सुकी, शकलेन पटेल, राजाराम तोरसकर, दिवाकर पवार, विनोद चौगुले आदी पदाधिकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.