पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भोगवे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील प्राथमिक शाळा व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना फळे व खाऊ वाटप.

पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भोगवे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील प्राथमिक शाळा व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना फळे व खाऊ वाटप.

वेंगुर्ला.

   सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदूर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भोगवे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील प्राथमिक शाळा व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना फळे तथा गोड खाऊ वाटप करण्यात आले.
   पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून भोगवे गावात अनेक वर्ष रखडलेल्या कीत्येक विकास कामास आज चालना मिळत आहे तर काही कामे ही प्रगतीपथावर आहेत.अशा या महान कार्यधुरंदर, लोकाभिमुख, व्यक्तीमत्वाच्या उत्कर्षरूपी कर्तृत्वामुळे भोगवे गाव आता बहरतो आहे. निश्चितच येत्या काही नजिकच्या वर्षांत भोगवे गाव हा सुजलाम सुफलाम होईल. अशा या थोर व्यक्तीमत्वाचा वाढदिवस मोठ्या उत्साही वातावरणात भोगवे गावात आज साजरा करण्यात आला. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांना उदंड निरोगी आयुष्य लाभो अशी प्रार्थना करण्यात आली.
   यावेळी भोगवे ग्रामपंचायत उपसरपंच रूपेश मुंडये, ग्रामपंचायत सदस्या आरती कोळंबकर, राजश्री कोळंबकर, अंगणवाडी सेविका, पालकवर्ग, शिक्षक वर्ग, आरोग्य सेविका, व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य तसेच स्थानिक ग्रामस्थ व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.