शासकीय सहकारी व लेखा पदविका परीक्षा मे महिन्यात

शासकीय सहकारी व लेखा पदविका परीक्षा मे महिन्यात

 

सिंधुदुर्गनगरी

 

       शासकीय सहकारी व लेखा पदविका (जी.डी.सी ॲण्ड ए.) व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र (सी.एच.एम) परीक्षा दि. २६,२७ व २८ मे २०२६ रोजी घेण्यात येत आहे. या परीक्षेसाठी सन २०२६ पासून ‘रत्नागिरी’ हे १७ वे परीक्षा केंद्र नव्याने सुरू करण्यात आले आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी केंद्र क्रमांक १७ ‘रत्नागिरी’ या परीक्षा केंद्राची निवड करावी,असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सिंधुदुर्ग यांनी केले आहे.