कणकवली येथे दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न.

कणकवली येथे दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न.

कणकवली.

    ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा कणकवली, ज्येष्ठ नागरिक सेवा संघ कणकवली व पेन्शनर असोसिएशन कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने कणकवली तालुक्यातील शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ मधील इ.दहावी व बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पेन्शनर भवन कणकवली पोलीस स्टेशन नजीक आचरा रोड कलमठ कणकवली येथे नुकताच संपन्न झाला.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मानीय सिताराम उर्फ दादा कुडतरकर जिल्हासंघटक ग्राहक पंचायत  महाराष्ट्र अन अध्यक्ष पेन्शनर असो, कणकवली तालुका उपस्थित होते.ते आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले कि आपण सर्व विद्यार्थ्यी व पालकांच्या अपार कष्टामुळे एवढे 98ते100टक्के  गुण प्राप्त केलात.त्याबद्दल तुम्हा सर्वाचे विशेष अभिनंदन.तुम्ही यापुढील आयुष्यात वेग वेगळया स्पर्धे परीक्षांना सामोरे जा. स्पर्धामक युगात विद्यार्थ्यांनी नियोजन करून शैक्षणिक व जबर इच्छाशक्ती चे जोरावर अडचणींवर मात करून यशस्वी होऊन शासकीय पदांवर विराजमान व्हाल हीच सदिच्छा असे प्रतिपादन करून आईवडील अन गुरुजनांची आठवण तेव्हा असे आग्रही सूतोवाच केले,यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सन्माननीय श्री. मनोहर आंबेरकर  जिल्हाध्यक्ष पेन्शनर असो सिंधुदुर्ग यानी आपल्या मनोगतात सागितले कि जसा आज तुमचा ज्येष्ठाच्या हस्ते सत्कार होत आहे.त्याप्रमाणेच पुढील तुमच्या आयुष्यात तुमच्या हातून जेष्ठाचा सत्कार  सन्मान करा.सन्माननीय श्री.भालचंद्र मराठे जिल्हाध्यक्ष ज्येष्ठ नागरिक सेवा संघ सिंधुदुर्ग हे उपस्थित होते.त्यांनी आपले विचार मांडताना सागितले कि आजकाल विद्यार्थी शिक्षण पूर्ण केल्यानंतर परदेशात नोकरी साठी परदेशात जाऊन तिथेच स्थायिक होतात. स्वतः च्या आईवडिलांना वृध्दाश्रमात ठेवतात.स्वतःच्या आईवडिलांना त्यांच्या कडे वेळ नसतो.हे सर्व प्रकार बंद झाले पाहिजेत एवढेच काय वृध्दाश्रमच बंद झाले पाहिजेत.
   यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविकात सौ.श्रद्धा कदम यांनी सागितले कि आजच्या विद्यार्थी यांच्यामध्ये टॅलेंट आहे.त्यामुळेच एवढे मार्क्स प्राप्त करून सर्व विद्यार्थी यश संपादन करू शकले. त्यासाठी त्यानी केलेले प्रामाणिक प्रयत्न त्याची जिद्द चिकाटी मेहनत आहे.त्याचप्रमाणे त्यांचे पालक व गुरूजन यांच्या प्रोत्साहनामुळेच शक्य होऊ शकले.हे विसरून चालणार नाही.त्यांचे ॠण तुम्ही कधीही विसरू नका.यावेळी सजग विदयार्थी म्हणून आपण कोणती काळजी घ्यावी. म्हणून ग्राहक चळवळी विषयी थोडक्यात माहिती दिली.
    यावेळी सन्माननीय मनोहर पालयेकर यानी शिक्षणाविषयी असले कांतीसूर्य महात्मा फुले यांचे शिक्षणाविषयी विचार सागितले.वृध्दाश्रमात एका वडिलांवर स्वत: चा मुलगा अंतसंस्कार करू शकत नाही याचे उदाहरण सागितले.यावेळी मोहन सावंत, राजस रेगे, श्री. सपकाळ यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
   सत्कार समारंभ आयोजित कार्यक्रमावेळी विज्ञानी प्रभु हिने इंग्रजीतून आपले विचार व्यक्त केले.पालकामधुन  विजयकुमार राठोड व सतीश मडव यानी मनोगत व्यक्त करताना म्हणाले कि आजचा कार्यक्रम हा घरचा असल्या सारखा वाटला.यामध्ये कुठेही दिखाऊपणा जाणवला नाही.खर पाहिले तर घरातील ज्येष्ठांनी दिलेली मायेची पाठीवर थाप आहे.आपल्या प्रयत्नामुळे हा क्षण आम्हाला अनुभवायला मिळाला हे आमचे भाग्य समजतो.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सन्माननीय रिमा भोसले मॅडम जिल्हा सह संघटक महिला प्रतिनिधी ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य यानी प्रसंगोचित अन समयोचित सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालन केले,यावेळी सर्व संघटनाचे सचिव  पूजा सावंत, प्रमोद लिमये व विलास चव्हाण अन ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य,जेष्ट नागरिक सेवा संघ,पेन्शनर असो कणकवली तालुका सर्व पदाधिकारी अन सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.कार्यकमाचे आभार प्रदर्शन प्रमोद लिमये यानी केले.