सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च परीक्षेत कळसुलकर प्राथमिक शाळेचे यश.

सावंतवाडी
सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळा म्हणजेच कळसुलकर प्राथमिक शाळेच्या इयत्ता दुसरी, तिसरी व चौथीच्या तब्बल 49 विद्यार्थ्यांनी सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च परीक्षा 2025 मध्ये भरघोस यश संपादन करीत विविध पदके मिळवली. सदर परीक्षेत इयत्ता चौथी मधून आरुष नाईक, देवाशिष फाले, श्रीकर शुक्ल, अंश सावंत, शिवम बरुड, साहिल खरात. इयत्ता तिसरी मधून धारा कोरगावकर, चैतन्य सावंत, श्रेष्ठ कडव, वेद गवस, रत्नाराम रबारी. इयत्ता दुसरी प्रत्युष जाधव हे 12 विद्यार्थी सुवर्णपदकाचे मानकरी ठरले आहेत. त्याचबरोबर इयत्ता चौथी मधून सार्थक बंगाळ, अथर्व लाड, प्रणव बरागडे, आदित्य जानकर, त्रिवेणी सुकी, कुश राऊळ, सर्वेश भिसे, स्वामिनी कोळी, सुधांश सहानी. इयत्ता तिसरी मधून गार्गी पई, मैत्री वेतोरकर, अवनी आवटे, गार्गी गुंजाळ, चैत्राली काळे, सार्थक वरक, कृष्णा पायशेट, हेरंब तुुयेकर, सार्थक नाईक, कौस्तुभ पास्ते, शौर्य अपराध, संकेत परब. इयत्ता दुसरी मधून दर्श पडते, युगराज सावरवाडकर, ध्रुव नाडकर्णी, हिमानी कोलगावकर अशा 25 विद्यार्थ्यांनी रौप्य पदक पटकावले. तसेच इयत्ता चौथीच्या अर्णव काकतकर, लीना बांदेकर, तनया बागुल, चार्वी ठाकूर, आराध्य नाईक, स्वरा पाटकर, प्रज्वल ठाकूर, केशव लातये. इयत्ता तिसरीच्या मेधांश मेस्त्री, कौशल मसुरकर, इयत्ता दुसरीच्या श्राव्या परब, नेत्रा पवार या 12 विद्यार्थ्यांनी कांस्य पदक मिळवले. अशा एकूण ४९ विद्यार्थ्यांनी विविध पदकांची कमाई करत शाळेचे नाव उंचावले आहे. या स्पर्धेमध्ये कळसुलकर प्राथमिक शाळेचे विद्यार्थी दरवर्षी सहभाग घेऊन यश संपादन करतात. त्याचप्रमाणे याहीवर्षी या शाळेच्या विद्यार्थ्यांनी यशाची ही परंपरा अबाधित ठेवली आहे. शाळेच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष शैलेश पई, सचिव डॉ. प्रसाद नार्वेकर, संचालिका राजश्री टिपणीस, नम्रता नेवगी यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घेत त्यांचे अभिनंदन केले. त्याचबरोबर शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप सावंत सर्व मार्गदर्शक शिक्षक यांचेही कौतुक केले.