एलएलबी ३ वर्षांच्या सीईटीची तारीख बदलली......दोन दिवस आधीच होणार परीक्षा

एलएलबी ३ वर्षांच्या सीईटीची तारीख बदलली......दोन दिवस आधीच होणार परीक्षा

 

 

मुंबई

 

          राज्यातील विधी महाविद्यालयात एलएलबी ३ वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची सीईटी ३ आणि ४ मे रोजी पाच सत्रात आयोजित करण्यात आली होती. त्यात सीईटी सेलने बदल करून ४ मे रोजी होणारी परीक्षा दोन दिवस आधी म्हणजेच २ मे रोजी घेतली जाणार आहे.यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचे हॉलतिकीट आणि बदलण्यात आलेल्या तारखेची माहिती त्यांच्या ईमेल आणि एसएमएसच्या माध्यमातून दिली जाणार असल्याची माहिती सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी  मुंबईत दिली. ४ मे रोजी नीट ची परीक्षा असून त्या दिवशी राज्यातील अनेक परीक्षा केंद्र यामुळे व्यापून राहणार आहेत, त्यामुळे एलएलबीची सीईटी देणाऱ्या सुमारे ९ हजार विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र आणि इतर अडचणी येत होत्या. त्यामुळे ४ मे रोजीची परीक्षा ही आता २ मे रोजी होईल, अशी माहिती आयुक्तांनी दिली. विद्यार्थ्यांना आजच एलएलबीची सीईटीचे ॲडमिट कार्ड आणि त्यात परीक्षा त्यांच्या बदलण्यात आलेल्या तारखा याची माहिती दिली जाणार आहे. एलएलबी सीईटी ही परीक्षा २ मे रोजी तीन सत्रात तर ३ मे रोजी दोन सत्रात होईल. यात सुमारे ९५ हजार विद्यार्थी परीक्षेला बसतील.