ईद-ए-मिलाद सणानिमित्त कणकवली मुस्लिम समाजाकडून सरबत वाटपाचा कार्यक्रम. माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांची प्रमुख उपस्थिती.

ईद-ए-मिलाद सणानिमित्त कणकवली मुस्लिम समाजाकडून सरबत वाटपाचा कार्यक्रम.  माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांची प्रमुख उपस्थिती.

कणकवली.

   येथील मुस्लिम बांधवांनी ईद-ए-मिलाद सणा निमित्त आज सरबत वाटपाचा कार्यक्रम केला. मुस्लिम धर्माचे संदेशवाहक मोहम्मद पैगंबर यांचा जन्म दिवस ईद-ए-मिलाद सण म्हणून साजरा केला जातो. मुस्लिम कॅलेंडर प्रमाणे ईद-ए -मिलाद तिसऱ्या महिन्याच्या रबी-उल-अव्वल च्या बाराव्या दिवशी मनवला जातो.मुस्लिम लोकांसाठी आजचा दिवस खूप आनंदाचा असतो. याला मराठा समाजाने देखील भेट दिली.
   यावेळी आमदार नितेश राणे यांनी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या मोबाईलवरुन व्हिडीओ कॉल द्वारे सर्व मुस्लिम बांधवांना ईद- ए -मिलाद च्या शुभेच्छा दिल्या.
   यावेळी बोलताना माजी नगराध्यक्ष समीर नलावडे म्हणाले की मोहंमद पैगंबर हे सर्व समाजात शांतता प्रस्थापित व्हावी हा उपदेश करत असत.मोहम्मद पैगंबर हे शांततेचे प्रतीक होते. देशात किंवा राज्यातील कुठल्याही भागात जरी हिंदू मुस्लिम धर्मीयांमध्ये तेढ निर्माण झाल्याचा अनुचित प्रसंग घडला तरीही कणकवली शहर आणि तालुक्यात मात्र हिंदू- मुस्लिम बांधव हे गुण्यागोविंदाने नांदत असतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कणकवली तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी अनंत चतुर्दशी दिवशी ईद सण असतानाही धार्मिक सलोखा राखावा आणि कायदा व सुव्यस्थेवर ताण येऊ नये यासाठी सामंजस्याने अनंत चतुर्दशी दिवशी ईद साजरी न करता आज 29 सप्टेंबर रोजी जल्लोषात ईद साजरी करण्याचा निर्णय घेतला. एकमेकांच्या सणांचे महत्व अबाधित राखून एकोप्याने एकमेकांच्या सणासुदीत सहभागी होण्याची परंपरा कणकवली शहर आणि तालुक्यातील हिंदू मुस्लिम बांधवांनी जोपासली आहे. अबिद नाईक आणि माझ्यात भावाप्रमाणे नाते आहे. म्हणूनच आज मुस्लिम बांधवांच्या उत्सवात सहभागी होत मी ईद च्या शुभेच्छा देत आहे. आसिफ नाईक यांनी सांगितले की मुस्लिम धर्माचे प्रेषित मोहंमद पैगंबर यांचा जन्मदिवस हा ईद ए मिलाद म्हणून
साजरा केला जातो. कणकवली शहरासह तालुक्यात ईद सणात सर्वच हिंदू बांधव सुद्धा सामील असतात. या आनंदाच्या दिवशी आज कणकवली तालुका मुस्लिम समाज कमिटी च्या वतीने मोफत सरबत वाटप करण्यात आले आहे.
   हा कार्यक्रम कणकवली बाजारात राबविण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निसार शेख, शानू शहा, अस्लम निशानदार, सर्फराज शेख, सलाम पटेल, आसिफ पटेल, अस्लम धारवाडकर, शफिक् अलगुर, मुदजफ्फर शेख, शादाप शेख, अब्दुल उडियांन यांनी परिश्रम घेतले.
  यावेळी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, शिशिर परुळेकर, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष (अजित पवार गट) अबिद नाईक,अजीम कुडाळकर, आसिफ नाईक, ऍड अष्पाक शेख, निसार काझी, इम्रान शेख, सलाउद्दीन कुडाळकर, बडेमिया शेख, इबु शेख, मूदस्सर मुकादम, झाकीर हुदली, जावेद शेख, तौसिफ बागवान, बाबूल पटेल, सादिक कुडाळकर, अब्दुल नाईक आदी उपस्थित होते.