मत्स्य आणि बंदर खात्याचे मंत्री झाल्यानंतर नीतेश राणे पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्ह्यात

मत्स्य आणि बंदर खात्याचे मंत्री झाल्यानंतर नीतेश राणे पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्ह्यात

 

सिंधुदुर्ग 
     कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मत्स्य आणि बंदर खात्याचे मंत्री नीतेश राणे आज पहिल्यांदाच मतदारसंघ व जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या त्यांच्या दौऱ्यात जिल्हयाच्या प्रवेशद्वार असलेल्या खारेपाटणपासून ते जिल्हाभर ठिकठिकाणी त्यांचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. त्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नियोजन केले असून हे स्वागत न भूतो न भविष्यती असे करण्यात येणार आहे. तसेच सायंकाळी ७.३० वा. येथील उपजिल्हा रुग्णालयासमोर राणे यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे.कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ पहिल्यांदाच घेतल्यानंतर येत असलेल्या या दौऱ्यात राणे सकाळी ९.१५ वा. राजापूर तालुक्यातील रेवतळे येथे हेलिकॉप्टरने येणार आहेत. तेथून पुढे सकाळी ९.३० वाजता ते खारेपाटण येथे येणार असून तेथे स्वागत होईल. त्यानंतर देवगड-पडेल येथे सकाळी ११ वाजता भाजप कार्यालयात  त्यांचे स्वागत करण्यात येईल. तर ११.३० वा. देवगड भाजप कार्यालयात स्वागत होणार आहे. १२.१५ वा. तळेबाजार येथे स्वागत, १२.४५ वाजता शिरगाव बाजारपेठ येथे त्यांचे भव्य स्वागत होणार आहे. दुपारी १.१५ वा. नांदगाव बाजारपेठमध्ये स्वागत समारंभ, त्यानंतर सिंधुदुर्गनगरी येथे भाजप कार्यालयात दुपार २ वाजता, तर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत २.३० वा. स्वागत, त्यानंतर सावंतवाडी-बांदा येथे ३.३० वाजता स्वागत होणार आहे. त्यानंतर ते दोडामार्ग येथे रवाना होतील. दोडामार्ग येथे ४.१५ वा. स्वागत होणार आहे, तर सायंकाळी ६ वाजता कुडाळ येथे स्वागत समारंभ होणार आहे.त्यानंतर  राणे हे कणकवलीकडे रवाना होणार असून ७.३० वा. येथील उपजिल्हा रुग्णालयासमोर त्यांचा भव्य नागरी सत्कार समारंभ होणार आहे. मंत्री झाल्यानंतर नीतश राणे यांचा पहिलाच जिल्हा दौरा असून त्यामध्ये सर्वच कार्यकर्ते त्यांच्या स्वागतसाठी उत्सुक असून सर्वत्र त्यांच्या स्वागताचे भव्य बॅनरही लावण्यात आले आहेत.